Mangala Gauri 2022 : मंगळागौरी पूजन का करतात? जाणून घ्या आख्यायिका

Mangala Gauri 2022 : मंगळागौरी पूजन का करतात? जाणून घ्या आख्यायिका

Mangala Gauri 2022 : श्रावण <a href="https://ift.tt/2uTlCrm 2022) महिना हा विविध सण, उत्सवांचा सण. याच महिन्यात येणारा उत्सव म्हणजेच मंगळागौर. श्रावण महिन्यात मंगळागौरीला विशेष महत्त्व आहे. या महिन्यातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे पूजन केले जाते. मंगळागौरीचे व्रत हे पार्वती देवी म्हणजेच गौरीला समर्पित आहे. घरात समृद्धी यावी, उत्तम आरोग्य लाभावं आणि वैवाहिक सुखाच्या आशीर्वादासाठी यासाठी मंगळागौरीचे पूजन केले जाते. श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी हे व्रत केले जाते. असे मानले जाते की, विवाहित महिलांसाठी मंगळागौरीचे व्रत केल्यास त्यांना शाश्वत सौभाग्य प्राप्त होते आणि त्यांचे दांपत्य जीवन आनंदी होते. याच मंगळागौरी मागची कथा ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर यांनी सांगितली आहे ती जाणून घेऊयात.

मंगळागौरीची कथा :

मंगळागौरीची कथा ही कथा साधारण सत्यनारायण कथेप्रमाणेच आहे. साधूवाण्याप्रमाणे इथेही एक धनपाल वाणी आहे हे विशेष! त्या कथेचा सारांश असा की धनपाल वाण्याला मूल नव्हते. त्याच्या दारात रोज एक गोसावी भिक्षा मागण्यासाठी येई. पण अपत्यहीन वाण्याकडची भिक्षा नाकारून तसाच परत जाई. एकदा वाण्याच्या सांगण्यावरून त्याच्या पत्नीने लपून बसून अचानक पुढे होऊन त्या गोसाव्याला भिक्षा वाढली. त्यामुळे गोसावी रागावला. परंतु वाण्याच्या बायकोने क्षमायाचना केल्यावर त्याने दया येऊन एक उपाय सुचविला. त्यानुसार निळ्या घोडीवर निळा पोशाख करून वाणी वनातून जात असताना जिथे घोडा अडला तिथे खणल्यावर त्याला पार्वतीचे देऊळ लागले. पार्वतीमातेला त्याने आपली व्यथा सांगितली. पार्वतीमातेने त्याला दीर्घायुषी आंधळा अथवा गुणी पण अल्पायुषी ह्या दोघापैकी कसा मुलगा हवा ते विचारले. त्यावेळी वाण्याने गुणी परंतु अल्पायुषी मुलगा चालेल असे सागितले. मग देवीने त्याला देवळाच्या पाठच्या आंब्याच्या झाडावरून एक आंबा तोडून तो पत्नीला खावयास देण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्या वाण्याने एक आंबा पत्नीला नेऊन दिला. तिने तो खाल्ला.

पुढे देवीच्या कृपेने तिला मुलगा झाला. त्यांनी त्या मुलाचे नाव ‘शिव’ ठेवले. यथाकाल त्याची मुंज केली. तो दहा वर्षांचा असतानाच त्याला मुली सांगून येऊ लागल्या. तो ससेमिरा चुकविण्यासाठी मग वाण्याने मामासह शिवाला काशीयात्रेला पाठविले. वाटेत एका नगरातील बागेजवळून जाताना लहान मुलींचे भांडण होत होते. ते मामांनी ऐकले. त्यातील एका मुलीने सुशीला नावाच्या दुसऱ्या मुलीला काही अपशब्द ऐकविला. त्यावेळी ती मुलगी म्हणाली, ‘माझ्या आईने गौरीव्रत केल्यामुळे मी कधीच विधवा होणार नाही. ‘ ते ऐकून शिवाच्या मामाने ह्या मुलीशी शिवाचे लग्न करून द्यायचे असे मनाशी ठरविले. पुढे यथाकाल विविध अडचणींचा परिहार होत होत त्यांचा विवाह, वियोग आणि पुनर्मिलन होते.

काहीशी सत्यनारायण आणि वटपौर्णिमेच्या कथानकाशी मिळतीजुळती ही कथा मंगलागौरीच्या पूजेच्या पुस्तिकेत सविस्तरपणे दिलेली असते. तिचे वाचन झाल्यावर सर्व स्त्रियांनी हातातील तांदूळ गौरीला वाहून तिला नमस्कार करावा. नंतर मौन धारण करून जेवावे. रात्रौ उपवासाचे, फराळाचे पदार्थ खाऊन विविध गाणी आणि खेळ खेळावेत. एकमेकींना हळदकुंकू द्यावे-ध्यावे. पाच अथवा सात वर्षांनी उद्यापन करावे ह्या सर्व पूजेमध्ये चण्याच्या डाळीचे, धण्याचे, जिऱ्याचे आणि तांदळाचे प्रत्येकी सोळा दाणे देवीला वाहिले जातात तसेच सोळा पत्रींबरोबर बेलाची पाच पाने वाहिली जातात. दुसऱ्या दिवशी अग्निस्थापना केल्यानंतर तीळ, खीर आणि तूप ह्यांचा होम करावा. सुपामध्ये साडीचोळी, गोड पदार्थ आणि फळे घालून ते वायन मुलीने आईला, आई नसल्यास माहेरच्या दुसऱ्या सवाष्णीला द्यावे. त्यानंतर गौरीचे विसर्जन करावे.

महत्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/1BhKFQu 2022 : श्रावण महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?

<a href="https://ift.tt/rxtdmac Panchami 2022 : यंदाची नागपंचमी कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, तिथी आणि महत्त्व

<a href="https://ift.tt/eWhmg5X Days in August : ऑगस्ट महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Mangala Gauri 2022 : मंगळागौरी पूजन का करतात? जाणून घ्या आख्यायिकाhttps://ift.tt/tMwSXY6

0 Response to "Mangala Gauri 2022 : मंगळागौरी पूजन का करतात? जाणून घ्या आख्यायिका"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel