TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

MCC NEET Counselling Timetable: एनईईटी पीजीचं समुपदेशन कसं होणार, कधी होणार? पहा संपूर्ण वेळापत्रक Rojgar News

NEET Counselling

वैद्यकीय समुपदेशन समितीने (MCC) एनईईटी पीजी समुपदेशन 2022 (NEET PG Counselling 2022) च्या तारखा जाहीर केल्या आहेत. एनईईटी पीजी समुपदेशनाचे संपूर्ण वेळापत्रक एमसीसीने mcc.nic.in अधिकृत वेबसाइटवर जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांना ०१ सप्टेंबर ते 04 सप्टेंबर या कालावधीत नीट पीजी समुपदेशनासाठी ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. एमसीसीने एनईईटी पीजी आणि एमडीएससाठी 50 टक्के अखिल भारतीय कोटा (AIQ) आणि 100 टक्के अभिमत / केंद्रीय विद्यापीठांसाठी ऑनलाइन समुपदेशन आणि वाटप प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार 01 सप्टेंबर ते 04 सप्टेंबर 2022 या कालावधीत समुपदेशनासाठी ऑनलाइन नोंदणी करण्यात येणार आहे. मात्र, 04 सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना शुल्क भरता येणार आहे.

परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्यांनाच समुपदेशन

त्याचबरोबर नीट पीजी समुपदेशनाची चॉइस फिलिंग प्रक्रिया 02 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजल्यापासून सुरू होणार असून, ती 05 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. एनईईटी पीजी 2022 परीक्षेत उत्तीर्ण होणारे विद्यार्थीच समुपदेशन प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात.

विद्यार्थी एमसीसीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात

एनईईटी पीजी समुपदेशन आणि निवड फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सीट अलॉटमेंट प्रक्रिया सुरू केली जाईल. सीट अलॉटमेंट प्रक्रिया 06 व 07 सप्टेंबर 2022 रोजी होणार आहे. त्याचबरोबर तात्पुरत्या वेळापत्रकानुसार समुपदेशनाचा (नीट पीजी समुपदेशन निकाल) निकाल 08 सप्टेंबर 2022 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी रिपोर्टिंग आणि जॉइनिंग डेट 09 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर 2022 पर्यंत ठेवण्यात आली आहे. समुपदेशनाशी संबंधित अधिक माहितीसाठी, विद्यार्थी एमसीसीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

महत्त्वाच्या तारखा

  • 01 सप्टेंबर ते 04 सप्टेंबर 2022 – ऑनलाइन नोंदणी
  • 04 सप्टेंबर रात्री आठ वाजेपर्यंत – शुल्क भरता येणार
  • 02 सप्टेंबर दुपारी 3 वाजल्यापासून ते 05 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत – चॉइस फिलिंग प्रक्रिया
  • 06 व 07 सप्टेंबर 2022 – सीट अलॉटमेंट प्रक्रिया
  • 08 सप्टेंबर 2022 – समुपदेशनाचा निकाल
  • 09 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर 2022 – रिपोर्टिंग आणि जॉइनिंग डेट

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: MCC NEET Counselling Timetable: एनईईटी पीजीचं समुपदेशन कसं होणार, कधी होणार? पहा संपूर्ण वेळापत्रकhttps://ift.tt/OenupC1

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या