MPSC Exam: ‘एमपीएससी’ कडून स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीमध्ये बदल! काय आहेत बदल जाणून घ्या… Rojgar News

MPSC Exam: ‘एमपीएससी’ कडून स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीमध्ये बदल! काय आहेत बदल जाणून घ्या… Rojgar News

MPSC Exam change

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) आयोजित विविध स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. यासंदर्भातील परिपत्रक संकेतस्थळावर सोमवारी जाहीर करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या एमपीएससीमार्फत भरल्या जाणाऱ्या क्लास वन आणि क्लास टू (राजपत्रित) पदासाठी एकच पूर्व परीक्षा त्याचबरोबर ग्रुप बी आणि ग्रुप सी (Group B And Group C) साठी ही एक पूर्व परीक्षा असणार आहे. मात्र, मुख्य परीक्षा वेगवेगळ्या होणार आहेत. हा बदल 2023 पासूनच्या सर्व परीक्षांपासून लागू होणार आहे. मात्र मुख्य परीक्षा (Main Exam MPSC) वेगवेगळ्या होणार आहेत.

एमपीएससीने शासन सेवेतील विविध संवर्गाकरिता राबविण्यात येणाऱ्या विद्यमान भरतीप्रक्रियेमुळे परीक्षांची वाढलेली संख्या, उमेदवार व प्रशासकीय यंत्रणेवर येणारा ताण, भरतीप्रक्रियेस होणारा विलंब, गुणवत्ता राखण्यासाठी सतत करावे लागणारे प्रयत्न, प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून करावयाच्या विविध उपाययोजना, भविष्यामधील भरतीप्रक्रियेचे नियोजन अशा विविध बाबींचा विचार करून आयोगामार्फत आयोजित विविध स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीमध्ये बदल केल्याचे स्पष्ट केले आहे.

काय आहेत बदल जाणून घ्या…

 • सर्व राजपत्रित गट अ व गट ब संवर्गाकरिता यापुढे पारंपरिक वर्णनात्मक स्वरूपाच्या मुख्य परीक्षेच्या आधारे निवड प्रक्रिया
 • राजपत्रित गट अ व गट ब संवर्गातील पदभरतीकरिता महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा या नावाने एकच संयुक्त पूर्व परीक्षा होणार
 • सर्व राजपत्रित गट अ व गट ब संवर्गाकरिता महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व स्पर्धा परीक्षेद्वारे भरतीप्रक्रिया होणार
 • मुख्य परीक्षेसाठी पात्र करावयाच्या उमेदवारांची संख्या निश्चित करून पूर्व परीक्षेचा स्वतंत्र निकाल जाहीर करण्यात येईल.
 • राज्यसेवा मुख्य परीक्षा, स्थापत्य अभियांत्रिकी
 • सेवा मुख्य परीक्षा, वनसेवा मुख्य परीक्षा, कृषी सेवा मुख्य परीक्षा इत्यादी निश्चित करण्यात येणाऱ्या स्वतंत्र परीक्षा योजना व अभ्यासक्रमानुसार मुख्य परीक्षा घेण्यात येईल.
 • अराजपत्रित गट व व गट-क संवर्गासाठी महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या नावाने एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येईल. या संयुक्त पूर्व परीक्षेच्या आधारे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात येणाऱ्या सर्व अराजपत्रित गट – ब व गट-क संवर्गासाठी भरती प्रक्रिया होणार
 • अराजपत्रित सेवा गट-ब व गट-क मुख्य परीक्षेकरिता ‘मराठी व इंग्रजी’ तसेच ‘सामान्य
 • अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी’ अशा दोन पेपर्सच्या आधारे निवड होणार
 • महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-ब व सेवा गट-क मुख्य परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गाकरिता उमेदवारांकडून मुख्य परीक्षेचा अर्ज घेतानाच अर्हतेवर आधारित पसंतीक्रम ठरवणार
 • पोलिस उपनिरीक्षक संवर्गातील निवडीकरिता शारीरिक चाचणी 70 गुणांची असणार, निवड मुख्य परीक्षेतील गुण व मुलाखतीमधील गुणांच्या आधारे करण्यात येणार
 • दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग संवर्गाच्या विद्यमान भरतीप्रक्रियेमध्ये कोणताही बदल नाही.

हा बदल2023 च्या आयोजित परीक्षांपासून लागू अर्ज स्वीकारण्याची पद्धत, अर्हता प्रक्रिया, अभ्यासक्रम इत्यादीबाबतचा संकेतस्थळावर स्वतंत्रपणे दिला करण्यात येणार असून परीक्षा योजना, वयोमर्यादा, निवडीची सर्वसाधारण सविस्तर तपशील आयोगाच्या जाणार आहे.


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: MPSC Exam: ‘एमपीएससी’ कडून स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीमध्ये बदल! काय आहेत बदल जाणून घ्या…https://ift.tt/mWXGdH6

0 Response to "MPSC Exam: ‘एमपीएससी’ कडून स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीमध्ये बदल! काय आहेत बदल जाणून घ्या… Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel