Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, २७ ऑगस्ट, २०२२, ऑगस्ट २७, २०२२ WIB
Last Updated 2022-08-27T06:07:01Z
jobmarathimajhinaukrimajhinewsNmknmkadda

MPSC Result : एमपीएससीच्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; 1 हजार 279 विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र, पुण्याची बाजी Rojgar News

Advertisement
MPSC

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीतर्फे (MPSC Result) घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षा 2021 चा निकाल (Result) जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये एकूण 1 हजार 279 विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत.  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या या परीक्षेमध्ये पुणे (PUNE) केंद्राने बाजी मारली आहे. पुणे केंद्रातून  एकूण 903 उमेदवार परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. त्यापाठोपाठ औरंगाबाद केंद्रातून 113, नागपूर केंद्रातून 87, नाशिकमधून 77 मुंबई 75 तर अमरावती केंद्रातून एकूण 24 उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत. दिनांक सात मे ते नऊ  मे या कालावधीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने राज्य सेवा मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. तिचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. परीक्षेच्या निकालासह पात्रतागुणही आयोगाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहेत. या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी अपात्र ठरले आहेत, त्यांना जर आपल्या गुणाची पडताळणी करायची असेल तर त्यांनी दहा दिवसांच्या आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे असे देखील आयोगाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

पुणे केंद्राची बाजी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून  दिनांक दिनांक सात मे ते नऊ  मे या कालावधीत ही परीक्षा पार पडली होती. या परीक्षेत उत्तीर्ण होऊन मुलाखतीसाठी एकूण 1 हजार 279 उमेदवार पात्र ठरले आहे. या परीक्षेत पुणे केंद्राने बाजी मारली असून, पुणे केंद्रातील सर्वाधिक 903 उमेदवार परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. त्यापाठोपाठ औरंगाबाद केंद्रातून 113, नागपूर 87, नाशिक 77, मुंबई 75 आणि अमरावतीमधून एकूण  24 उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत. मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा मुलाखत कार्यक्रम स्वातंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती देखील आयोगाच्या वतीने देण्यात आली आहे.

पात्र उमेदवारांची यादी संकेतस्थळावर

या परीक्षेत एकूण  1 हजार 279 विद्यार्थी  उत्तीर्ण झाले आहेत. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांची यादी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा मुलाखत कार्यक्रम स्वातंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचं देखील महाराष्ट्र लोकसेवा आयोग वीतेने सांगण्यात आले आहे.


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: MPSC Result : एमपीएससीच्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; 1 हजार 279 विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र, पुण्याची बाजीhttps://www.tv9marathi.com/career