Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, १६ सप्टेंबर, २०२२, सप्टेंबर १६, २०२२ WIB
Last Updated 2022-09-15T18:48:08Z
careerLifeStyleResults

लॉकडाऊननंतर विषाणू संक्रमणामध्ये वाढीचे काय आहे कारण? जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ

Advertisement

Viral infection: गेल्या दोन महिन्यांपासून व्हायरल इन्फेक्शन (Viral infection) झपाट्याने वाढत आहे. दररोज वर्तमानपत्रांमध्ये इन्फ्लूएंझा आणि डेंग्यूपासून सामान्य सर्दी, हात, पाय आणि तोंडाचे आजार, कोविड आणि स्वाइन फ्लू या विषाणूजन्य तापाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याची माहिती समोर येत आहे. आता टोमॅटो फ्लू आणि मंकीपॉक्स सारख्या नवीन रोगांची सुरुवात देखील झाली आहे. मंकीपॉक्स विषाणू हळूहळू जगभरात पसरत आहे. स्वाइन फ्लूमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढत आहे आणि कोविड विषाणू अनेक प्रकारांमध्ये उत्परिवर्तीत होत आहे. ज्यामध्ये विषाणूची वाढ झालेली दिसून येत आहे. व्हायरल इन्फेक्शन्सच्या या वाढीमागे कोणतेही एक कारण नाही, परंतु असे अनेक घटक आहेत ज्यामुळे आता काही काळापासून व्हायरल इन्फेक्शन्स होण्यासाठी पूरक वातावरण निर्माण झाले आहे. याबाबतच अपोलो रुग्णालयाचे, कन्सल्टन्ट-इन्फेक्शियस डिसीजेस, डॉ. लक्ष्मण जेस्सानी यांनी माहीत दिली आहे.

जग लहान होत चाललंय. आधुनिक काळातील प्रवास हा एक रोग पसरवणारा प्रवास ठरत आहे. संसर्गजन्य रोग प्रवाशांबरोबर एका देशातून दुसऱ्या देशात फ्लाईटमधून प्रवास करतोय. ताजे उत्पादन, मांस, मासे आणि इतर साहित्य आज जगाच्या एका भागातून दुसऱ्या भागात नेले जातात. सूक्ष्मजीव आणि वेक्टर (रोग वाहक जंतू) देखील या वस्तूंबरोबर प्रवास करतात. वस्तूंच्या वहनातून काही वेक्टर (रोग वाहक जंतू) समोर आले आहेत, त्यापैकी डेंग्यू व्हायरस वेक्टर आणि आफ्रिकन अॅनोफिलीस डासांच्या प्रजाती देखील आहेत. त्याचप्रमाणे जेव्हा जागतिक लॉकडाऊन लागले होते, तेव्हा व्हायरल इन्फेक्शन अक्षरशः नाहीसे झाले होते. पण आता मंकीपॉक्स हा वेगळ्या खंडातून भारतात आला आहे.

शहरातली दाट गर्दी - शहरी भागामध्ये वायू प्रदूषण, अस्वच्छता आणि दूषित अन्न व पाणी ही समस्या उद्भवत आहे. शहरी लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या पर्यावरणीय प्रदूषकांच्या संपर्कात येत आहे जसे की ऑटोमोबाईल्समधून निघणारा धूर आणि धूळ तसेच बांधकामातून निर्माण होणारी विषारी द्रव्ये या सर्व गोष्टींमुळे हवा दूषित आहे. ग्रामीण भागातून शहरात होणारी स्थलांतरे देखील संसर्गजन्य रोगांच्या प्रसारास कारणीभूत ठरत आहे. नोकरी आणि चांगल्या आर्थिक संधींच्या शोधात अनेक जण स्थलांतर करतात, तर काही हवामान बदल आणि नैसर्गिक आपत्तींपासून बचाव करण्यासाठी स्थलांतर करतात. रुग्णांचा अतिरिक्त भार पडत असल्यामुळे शहरी आरोग्य व्यवस्थेवरही ताण पडतो आहे. या घटकांमुळे वेक्टरवरचे (रोग वाहक जंतूंवरचे) नियंत्रण कमी होते, परिणामी रोग निर्माण होतात आणि त्यांची संख्या वाढते.

यातच आणखी एक घटक म्हणजे जंगलतोड. जंगल तोडल्यामुळे पक्षी आणि प्राण्यांमधील नैसर्गिक विषाणू पोषक मानवांमध्ये पसरतात. अभ्यासातून असे समोर आले आहे की, SARS-CoV-2 विषाणू ज्यामुळे कोविड-19 होतो, हा विषाणू वटवाघळांपासून लोकांमध्ये पसरला. स्वाइन फ्लू आणि मंकीपॉक्स हे दोन्ही विषाणू प्राण्यांपासून पसरले आहेत. हे विषाणू प्राण्यांसाठी हानिकारक नसतात. परंतु जेव्हा हे विषाणू मानवांमध्ये संक्रमित होतात तेव्हा रोगाचा उद्रेक होतो, कारण हे सहन करण्याची प्रतिकारशक्ती माणसांमध्ये नसते.

जागतिक लॉकडाऊनचा परिणाम - महामारी दरम्यान कोविड-19 व्यतिरिक्त इतर रोगांसाठी लसीकरण करण्याची संख्या कमी झाली. डब्ल्युएचओ नुसार 2021 मध्ये जागतिक लसीकरणात घट झाली असून 25 दशलक्ष मुले जीवनरक्षक लसींपासून वंचित राहिली, त्यापैकी 60% मुले फक्त 10 देशांतील आहेत (भारत, पाकिस्तान आणि म्यानमार व इतर) तसेच 18 दशलक्ष लोकसंख्येला कोणतीही लस मिळालेली नाही.

हवामानातील बदल

संक्रमणास कारणीभूत रोगजनक जंतू देखील हवामान बदलामुळे वाढतात. हवामानातील बदलाचा परिणाम रोगाचे रोगजनक जंतू आणि विषाणू पोषकाच्या जगण्यावर, पुनर्निमितीवर व प्रसारावर होतो. तसेच भौगोलिक क्षेत्र आणि रोग वाहकांच्या वास्तव्यावर परिणाम होतो. तापमान, पर्जन्यमान आणि आर्द्रता यांसारख्या पर्यावरणीय परिस्थितींनुसार अनेक रोग-उद्भवणारे जीव पूर्वस्थितीत असतात. हवामान बदलामुळे या सर्वांवर परिणाम होतो. वाढलेला पाऊस आणि उच्च तापमानामुळे रोग वाहकांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते. दरम्यान हवामानातील तीव्र बदलातून आरोग्यसेवेच्या पायाभूत सुविधांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो आणि यामुळे रोगाचा प्रसार होण्याचे प्रमाण आणि धोका वाढू शकतो.

सज्ज रहा आणि खबरदारी घ्या

रोग व्यवस्थापनाच्या बाबतीत आपण अल्प-दृष्टी ठेवू शकत नाही. मंकीपॉक्सला आफ्रिकेत चांगल्या प्रकारे हाताळले गेले असते, तर हा विषाणू जगभरातील देशांमध्ये पसरला नसता. जर काही कमी आणि मध्यम-उत्पन्न असलेल्या देशांमध्ये कोविडला अधिक चांगल्या प्रकारे हाताळले गेले असते, तर कोविडची नवीन रूपे उदयास आली नसती. इन्फ्लूएन्झासाठी (शीतज्वरासाठी) लस उपलब्ध आहे, सामान्यतः ही लस फ्लू शॉट्स म्हणून ओळखली जाते जी फ्लूच्या आजाराचा धोका 40 - 60% कमी करते, परंतु आपल्यापैकी बऱ्याच जणांना त्याबद्दल माहिती नाही.

नवरात्री सारख्या सणांमध्ये लोक मोठ्या संख्येने एकत्र येतात. सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात लोक जमत असल्यामुळे उद्रेक होण्य़ाची आणि संसर्ग पसरण्याची चिंता निर्माण होते. विषाणूंच्या व्हेरिएंट्समध्ये संक्रमण होण्याची उच्च क्षमता असते, त्यामुळे लसीकरणाव्यतिरिक्त, संसर्गाची संख्या कमी करण्यासाठी सामाजिक उपाय महत्त्वाचे आहेत. मोठे उत्सव नेहमी हवेशीर भागात आयोजित केले पाहिजेत, कारण विषाणूचा प्रसार दारे, खिडक्या असलेल्या बंदिस्त जागेत होतो. शक्य तितकी मोठी संमेलने टाळली पाहिजेत आणि आपल्या कुटुंबाबरोबर उत्सव साजरा केला पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी, शारीरिक अंतर राखणे, फेस मास्क घालणे आणि हात आणि श्वासाच्या स्वच्छतेचे पालन करायला विसरू नका.

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: लॉकडाऊननंतर विषाणू संक्रमणामध्ये वाढीचे काय आहे कारण? जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञhttps://ift.tt/z9qpgG8