Ramdas kadam Education Details: रामदास कदम यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. मुंबई बोर्डाअंतर्गत १९७१ मध्ये त्यांनी दहावी पूर्ण केली. मायनेता वेबसाइटवरील माहितीनुसार रामदास कदम यांचे शालेय शिक्षण यशवंतराव चव्हाण हायस्कूलमधून पूर्ण झाले आहे. शिक्षण कमी असले तरीही शिवसेनेचे कांदिवलीतील गटप्रमुख, उपशाखाप्रमुख, शाखाप्रमुख आणि खेडचे आमदार ते राज्याचे पर्यावरणमंत्री पद अशी त्यांची राजकीय कारकिर्द उंचावत गेली.
source https://maharashtratimes.com/career/career-news/ramdas-kadam-education-details/articleshow/94293920.cms
0 टिप्पण्या