Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, १ सप्टेंबर, २०२२, सप्टेंबर ०१, २०२२ WIB
Last Updated 2022-08-31T19:48:51Z
careerLifeStyleResults

Gauri Pujan 2022 : गौराई माझी लाडाची लाडाची गं... शनिवारी कोणत्या शुभ मुहूर्तावर कराल गौरी आवाहन? पंचागकर्ते मोहन दाते सांगतात...

Advertisement

मुंबई : भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात गौरींचे पूजन (<a href="https://ift.tt/VcAU0mI Pujan 2022) करतात. गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार केला.  तेव्हापासून अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात.  गौरीपूजनला काही ठिकाणी महालक्ष्मीपूजन असेही म्हणतात.  गौरी किंवा महालक्ष्मीचे पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर केले जाते, म्हणून यांना ज्येष्ठागौरी असेही संबोधले जाते. यावर्षी अनुराधा नक्षत्रावर दिवसभरात केव्हाही गौरी आणून आवाहन करता येईल, असे पंचागकर्ते मोहन दाते म्हणाले.

गौरीच्या स्थापनेचा मुहूर्त काय आहे? (Gauri Pujan 2022 muhurat time)

गौरीपूजन गणपती बाप्पाच्या आगमनानंतर साजरा केले जाते.  गौरींचे माहेरवाशीणीसारखे स्वागत केले जाते. भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर शनिवारी, 3 सप्टेंबर 2022 गौरींचे घरोघरी आगमन होते.  ज्यांच्याकडे गौरी आहे त्यांनी अनुराधा नक्षत्रवर दिवसभरात केव्हाही गौरी आणून आवाहन करता येईल. 4 सप्टेंबरला रविवारी गौरीपूजन ज्याला आपण गौरी जेवतात असं म्हणतो तो रविवारचा दिवस आहे. ज्येष्ठा नक्षत्रावर गौरी पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. तिला गोडाधोडाचे जेवण केले जाते. यामध्ये 16 भाज्या, पंचपक्वान्न असा बेत केला जातो. नेहमीप्रमाणे  महालक्ष्मीची सकाळी दुपारी पूजा करून चांगला नैवेद्य दाखवून तो आपण प्रसाद म्हणून घ्यायचा आहे. 5 सप्टेंबरला मूळ नक्षत्रावर गौरींचे विसर्जन असल्याने रात्री 8 वाजेपर्यंत कधीही आपल्या सोयीने गौरी विसर्जन करू शकता.

गौरीचे स्वागत कसे करावे?

गौराई आली सोन्याच्या पावलांनी, माणिक मोत्याचा पावलांनी असे म्हणत गौरी माहेरवाशीण म्हणून येते. त्या दिवशी दारात रांगोळी काढून, लक्ष्मीची पावले काढून, ताट आणि चमचा वाजवत गौरीचे मुखवटे घरात आणले जातात. त्यांना छान दागिने, फुलांचे हार, नव्या साड्या नेसून गौरीला सजवले जाते. तिला गोडाधोडाचे जेवण केले जाते. यामध्ये 16 भाज्या, पंचपक्वान्न असा बेत केला जातो.

गौरीचे मुखावटे

विदर्भ, मराठवाड्यासह काही ठिकाणी महालक्ष्मींचे मुखवटे ठेवले जातात. विदर्भात खास करून गौरीला महालक्ष्मी म्हणतात. याशिवाय काही ठिकाणी तेरड्याची गौर असते. विविध भागात गौरीपूजनाच्या,  मांडणीच्या पद्धतीत आधुनिकता दिसून येते. गौरीसह त्यांची मुलेही मांडतात.   तर काही ठिकाणी राशीच्या महालक्ष्मी असतात. म्हणजेच घरातील पाच धान्यांच्या राशी मांडून त्यांची पूजा करण्याची पद्धत आहे.

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Gauri Pujan 2022 : गौराई माझी लाडाची लाडाची गं... शनिवारी कोणत्या शुभ मुहूर्तावर कराल गौरी आवाहन? पंचागकर्ते मोहन दाते सांगतात...https://ift.tt/kNa651O