Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, २२ सप्टेंबर, २०२२, सप्टेंबर २२, २०२२ WIB
Last Updated 2022-09-21T18:48:19Z
careerLifeStyleResults

Navratri Recipe : टेस्टही आणि चवीला बेस्ट... उपवासाचा खमंग ढोकळा बनवण्याची रेसिपी जाणून घ्या...

Advertisement

Upvasacha Dhokla Recipe : गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सवाची सर्वजण वाट पाहत आहेत. नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. येत्या 26 सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. नवरात्रोत्सवात अनेक मंडळी उपवास करतात. या दिवसांत हलका-फुलका आहार घेणं गरजेचं आहे. तर आज जाणून घ्या उपवासाचा खमंग ढोकळा (Upvasacha Dhokla Recipe) बनवण्याची रेसिपी...

'उपवासाचा खमंग ढोकळा' बनवण्यासाठी लागणारे साहित्य -

वरीचे पीठ - 1 कप

साबुदाणा - 1.4 कप पूड

दही - 1.2 कप

पाणी - 1.2 कप

बेकिंग सोडा - 1.2 चमचा

सैंधव मीठ - 1 चमचा

जिरे - 1 चमचा

लिंबाचा रस - 1.2 चमचा

कोथिंबीरीची पाने - 1 चमचा

हिरव्या मिरच्या - आवश्यकतेनुसार

'उपवासाचा खमंग ढोकळा' बनवण्याची कृती -

- एका वाटीत 1 कप वरीच्या तांदळाचे पाठी, साबुदाणा पावडर, दही, चवीनुसार सैंधव मीठ, आणि आवश्यकतेनुसार हिरव्या मिरच्या चिरुन त्यात पाणी घालून ते छान मिक्स करा.

- तयार झालेलं मिश्रण 5 ते 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवा.

- एका प्लेटला तेल लावून तयार झालेलं मिश्रण त्यामध्ये ओता.

- मिश्रण सर्वत्र एकसमान पसरुन घ्या.

- आता एका पॅनमध्ये दोन ग्लास पाणी उकळवून घ्या.

- आता त्या पॅनवर ढोकळ्याचं मिश्रण ओतलेली डिश ठेवा आणि पॅनवर झाकण ठेवा.

- हे मिश्रण 10 ते 15 मिनिटे वाफेवर शिजत ठेवा.

- त्याचवेळी बाजूला दुसरा एक पॅन घेऊन त्यामध्ये तेल गरम करा.

- गरम तेलामध्ये जीरे आणि बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून चांगलं परतून घ्या.

- ढोकळ्याला आपल्या आवडीच्या आकारात कट करा आणि हिरव्या मिरच्या आणि जिऱ्याच्या फोडणीने गार्निशिंग करा.

- तयार झालेल्या खमंग ढोकळ्याचा चटणीसोबत आस्वाद घ्या.

उपवास करताना काय काळजी घ्यावी?

- नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी कामाशिवाय प्रवास करणे टाळावे.

- आजारी असल्यास उपवास करणे टाळावे.

- गरोदर महिलेने वैद्यकीय सल्ला घेऊन उपवासाबाबतचा निर्णय घ्यावा.

- उपवासादरम्यान फळे आणि दुधाचं सेवन करावं.

- आपल्या क्षमतेचा विचार करुन उपवास करण्याचा निर्णय घ्यावा.

- उपवास करताना योग्य आहार घेणं गरजेचं आहे.

संबंधित बातम्या

<a href="https://ift.tt/JIe8Zub Recipe : उपवासाला खिचडी खाऊन कंटाळलात? 'हा' डोसा एकदा ट्राय कराच, पाहा सोपी रेसिपी

<a href="https://ift.tt/1ocjqZ6 Recipe : खुसखुशीत साबुदाण्याचे थालीपीठ बनवण्याची रेसिपी जाणून घ्या...

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Navratri Recipe : टेस्टही आणि चवीला बेस्ट... उपवासाचा खमंग ढोकळा बनवण्याची रेसिपी जाणून घ्या...https://ift.tt/pRNvPDJ