Teeth Whitening : मोत्यांसारखे पांढरे शुभ्र दात हवेयत? मग, स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टी येतील कामी!

Teeth Whitening : मोत्यांसारखे पांढरे शुभ्र दात हवेयत? मग, स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टी येतील कामी!

Teeth Whitening : दातांचा पिवळेपणा (Yellow Teeth) ही समस्या आपल्यापैकी अनेकांना आहे. दातांची योग्य ती काळजी घेऊनही दातांवर पिवळा थर दिसायला लागतो. अशावेळी अनेक लोक वेगवेगळे उपाय करून पाहतात. काही तर अगदी डॉक्टरांची मदतही घेतात. पिवळ्या दातांमुळे चारचौघात वावरताना देखील समस्या उद्भवतात. तर, पांढरे शुभ्र दात (Teeth Whitening) आपल्या व्यक्तिमत्त्वात भर घालतात. तुम्ही देखील दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी उपाय शोधात असाल, तर स्वयंपाक घरातील काही घटक तुमच्या कामी येतील. आपल्या स्वयंपाक घरात असे अनेक घटक आहेत, ज्यांचा वापर करून तुम्ही पांढरे शुभ्र दात (Teeth Whitening Home Remedies)  मिळवू शकता.

मीठ आणि राईचे तेल

मीठ आणि राईचे तेल दातांची चमक वाढवण्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते. दातांची चमक (Teeth Whitening)  वाढवण्यासाठी तुम्ही राईचे तेल आणि मीठाचा वापर करू शकता. यासाठी अर्धा चमचा मीठ घ्या आणि त्यात राईच्या तेलाचे काही थेंब व्यवस्थित मिसळा. आता या मिश्रणाने दात घासा. याच्या नियमित वापरणे दातांचा पिवळेपणा दूर होईल.

अंड्याचे कवच

अंडी वापरून झाल्यानंतर आपण त्याचे कवच फेकून देतो. मात्र, दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी हेच कवच अतिशय लाभदायी आहे. यासाठी अंड्याचे कवच व्यवस्थित धुवून, सुकवून त्याची बारीक पावडर तयार करा. अंड्याच्या कवचाच्या या पावडरने दात व्यवस्थित घासा. यामुळे दात पांढरेशुभ्र होतील.

बेकिंग सोडा आणि लिंबू

आपल्या स्वयंपाक घरात वापरले जाणारे छोटेसे लिंबू अनेक आजारांवर रामबाण उपाय आहे. दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी देखील याचा उपयोग होतो. यासाठी एक चमचा बेकिंग सोड्यात लिंबाचा रस मिसळा आणि त्याची व्यवस्थित पेस्ट तयार करा. या पेस्टने दात स्वच्छ घासा. साध्या पाण्याने गुळण्या करा. याने दातांचा पिवळेपणा दूर होण्यास मदत होईल. यासाठी नियमित या पेस्टचा वापर करावा.

संत्र्याचे साल

व्हिटामिन सीचा उत्तम स्त्रोत असणारी संत्री सगळेच आवडीने खातात. संत्र्याच्या गाभ्याप्रमाणेच त्याचे साल देखील अतिशय गुणकारी आहे. दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी देखील संत्र्याची साल अतिशय फायदेशीर ठरते. यासाठी संत्र्याची साल व्यवस्थित सुकवा आणि त्याची बारीक पावडर तयार करून ही पावडर एका हवाबंद डब्यात भरून ठेवा. या पावडरने नियमित दात घासल्यास दातांचा पिवळेपणा (Teeth Whitening) दूर होईल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.)

महत्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/E8i1wJc Tips : तांदळाचे जसे फायदे तसे तोटेही; जाणून घ्या अति प्रमाणात भात खाण्याचे दुष्परिणाम

<a href="https://ift.tt/gnxDVs8 Loss : रात्रीच्या जेवणात 'या' पदार्थांचं करा सेवन, पोट भरेल आणि वजनही कमी होईल

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Teeth Whitening : मोत्यांसारखे पांढरे शुभ्र दात हवेयत? मग, स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टी येतील कामी!https://ift.tt/95NWdJs

0 Response to "Teeth Whitening : मोत्यांसारखे पांढरे शुभ्र दात हवेयत? मग, स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टी येतील कामी!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel