Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, २२ ऑक्टोबर, २०२२, ऑक्टोबर २२, २०२२ WIB
Last Updated 2022-10-22T05:43:33Z
jobmarathimajhinaukrimajhinewsNmknmkadda

95 वेळा रिजेक्ट, 5 दिवस Resume घेऊन रस्त्यावर फिरला, MBA ग्रॅज्युएटची ही स्टोरी तर भारीच की! Rojgar News

Advertisement
Shahjad

एकदा नाकारलं, दोनदा नाकारलं तर माणूस पुन्हा तिसऱ्या ठिकाणी जातो. पण तब्बल 95 वेळा नोकरी(Jobs) नाकारल्यावर काय हालत होईल? बरं शिक्षण MBA ग्रॅज्युएट (MBA Graduate). काय करावं कळत नव्हतं. या पठ्ठ्यानं एक युक्तीच केली. थेट रस्त्यावर उभा राहिला. हातात resume, एक सूटकेस आणि त्यावर लिक्डइन क्यूआर कोडचा (QR Code) मोठा बोर्ड लावला… 5 दिवस रस्त्यावर ठाण मांडूनच….

तुम्हाला वाटलं असेल लोकांनी येड्यात काढलं असेल… पण अजिबात नाही.. पहिल्या दिवसापासून पठ्ठ्याला नोकरीसाठी अर्ज सुरु झाले. या पाच दिवसात फक्त एक ते दोन लोकांनीच त्याला निगेटिव्ह कमेंट दिली.

हा भाऊ आता येत्या नोव्हेंबर महिन्यात नवा जॉब जॉइन करतोय. त्यामुळे त्याची इंटरेस्टिंग स्टोरी वाचलीच पाहिजे.

तर हा तरुण आहे पाकिस्तानचा. नाव आहे मोहम्मद अरहम शहजाद. पण राहतो लंडनमध्ये. लंडनमध्ये मागच्या वर्षभरापासून तो नोकरी शोधतोय. MBA चं शिक्षण घेतल्यानंतर त्यानं 95 कंपन्यांना अर्ज केले. पण सगळीकडेच रिजेक्शन आलं.

मग त्याने कंफर्ट झोन सोडून आपलंच मार्केटिंग करायचा विचार केला. लंडनच्या रस्त्यावर उभा राहिला. रिझ्यूम, सूटकेस आणि लिक्डइन क्यूआर कोड घेऊन…

बिझनेस इनसायडरमध्ये शहजादनं मुलाखत दिली आहे. तो म्हणाला, वर्षभर नकार ऐकून मी थकलो होतो. पण थोडा वेगळा प्रयत्न करायचा विचार केला.

तो म्हणतो, 11 जुलैला सकाळीच ही कल्पना सूचली. एक बोर्ड तयार केला. त्यावर लिंक्डइन क्यूआर कोड चिटकवला. लंडनच्या फायनान्शियल डिस्ट्रिक्ट कनारी व्हार्पच्या दिशेने निघालो.

शहजाद म्हणतो, मी रस्त्यावर उभा राहिलो, पण लोकांना त्रास दिला नाही. पहिल्या दिवशीच संध्याकाळपर्यंत 200 लोकांनी मला अप्रोच केलं. हा प्रतिसाद माझ्यासाठी धक्कादायक होता.

शहजाद म्हणाला, रस्त्यावर माझ्याजवळ अनेकजण थांबले. क्यूआर कोड स्कॅन केला. माझा फोटो काढला. कुणी सेल्फी घेतला..

या वेळात JPMorgan चे डायरेक्टरदेखील माझ्याकडे आले. त्यांचं बिझनेस कार्ड दिलं. त्यानंतर त्यांनी माझा रिझ्यूम ऑफिसच्या परिसरात पाठवल्याचं सांगितलं…

एका शिक्षकाने विद्यार्थ्यांसहित शहजादसोबत फोटो काढला.

शहजादला आता डेटा अॅनलिस्टचा अगदी मनासारखा जॉब मिळालाय. पुढच्या आठवड्यात त्याचे आणखी 3 इंटरव्ह्यू आहेत.

ब्रिटनमध्ये काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्किल्ड वर्कर व्हिजा आवश्यक असतो. शहजादचा हा व्हिसा एक्सपायर झाला होता. त्यामुळे त्याला अनेक चांगल्या कंपन्यांत अर्ज करता येत नव्हता. या व्हिसासाठी 57 हजार रुपयांपासून 1 लाख 30 हजारांपर्यंत असते. शहजादने जुलै महिन्यात याविषयी लिंक्ड इनवर पोस्ट लिहिली होती.


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: 95 वेळा रिजेक्ट, 5 दिवस Resume घेऊन रस्त्यावर फिरला, MBA ग्रॅज्युएटची ही स्टोरी तर भारीच की!https://ift.tt/esbF516