Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, ७ ऑक्टोबर, २०२२, ऑक्टोबर ०७, २०२२ WIB
Last Updated 2022-10-07T02:48:59Z
careerLifeStyleResults

Health News : तांब्याच्या भांड्यातील पाणी प्या, 'या' आजारांपासून सुटका मिळवा

Advertisement

<a href="https://ift.tt/tAS2uer Water In Copper Vessel : तांब्याच्या भांड्यातील (Copper Vessel) पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. बहुतेक जण तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण या तांब्याच्या भांड्यातील म्हणजे तांबेयुक्त पाण्याचा तुमच्या शरीराला काय फायदा मिळतो, हे तुम्हाला माहित आहे का? नसेल तर आज येथे जाणून घ्या की, तुमच्या शरीरासाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी कशाप्रकारे गुणकारी आहे. आयुर्वेदामध्ये तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणं शरीरासाठी अत्यंत लाभदायक असल्याचं म्हटलं गेलं आहे. यामुळे पचनक्रिया सुरळीत होऊन शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यासाठीही मदत होते. याशिवाय तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने अनेक आजारांपासून सुटका होते.

पचन क्रिया सुधारते

तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायल्याने पचनशक्ती सुधारते. तांबे तुमच्या शरीरातील बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी प्रभावी आहे. तांब्यात अँटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात. तांब्याच्या भांड्यात पाणी जुलाब, कावीळ, अतिसार यांसारखे अनेक आजार पसरवणाऱ्या जिवाणूंना नष्ट करतं. तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायल्यामुळे पोटातील संसर्ग, अपचन आणि अल्सरची समस्या दूर होण्यास मदत होते. जर तुम्हाला पोटासंदर्भात कोणतीही समस्या असेल तर तांब्याच्या भांड्यात पाणी नियमित प्या. यामुळे तुम्हाला फायदा होईल.

ह्रदयासंबंधित आजारांवर गुणकारी

तांब्याच्या भांड्यातील पाणी हृदयासाठी फायदेशीर ठरते. तांबेयुक्त पाण्यामुळे ह्रदय निरोगी बनण्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यास मदत हेते. याशिवाय वात, पित्त आणि कफ यासंबंधित तक्रारीही दूर करण्यासाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी फायदेशीर ठरते.

अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत

तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास होते. तांब्यामध्ये तुमचे वाढते वजन नियंत्रित ठेवण्याचा गुणधर्म आहे. तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने चयापचय क्रिया वाढते. यामळे पचनक्रिया सुधारते आणि तुमचं वजन नियंत्रित राहण्यासाठी मदत होते.

कर्करोगाशी लढण्याची क्षमता

तांब्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-कॅन्सर गुणधर्म आढळतात, ज्यामुळे कॅन्सर पेशींची वाढ थांबते. शरीर निरोगी ठेवायचे असेल तर तांब्याच्या भांड्यात पाणी जरुर प्या. याचा तुम्हाला शरीराला खूप फायदा होईल.

अॅनिमियाची समस्या दूर होईल

तांबे आपल्या शरीरातील लोहाची कमतरता दूर करण्यात फायदेशीर आहे. तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायल्याने शरीरातील लोहाची कमतरता दूर होण्यास मदत होते. यामुळे तुमची अॅनिमियासारख्या गंभीर समस्यांपासून सुटका होऊ शकते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या इतर बातम्या

<a href="https://ift.tt/QkEwugR Water : तांब्याच्या भांड्यात पाणी किती वेळ ठेवणं फायदेशीर? तुम्ही करु नका 'ही' चूक

<a href="https://ift.tt/OKGhkeM Attack : काळजी घ्या! कोरोनानंतर वाढतोय हृदयविकाराचा धोका, डॉक्टरांनी सांगितलं 'हे' कारण

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health News : तांब्याच्या भांड्यातील पाणी प्या, 'या' आजारांपासून सुटका मिळवाhttps://ift.tt/j30JSsp