TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

Mental Health Insurance : 31 ऑक्टोबरपूर्वी मानसिक आजारासंबंधी विमा प्रदान करा, IRDA ची सर्व विमा कंपन्यांना सूचना

Mental Health Insurance : भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकारणाने (IRDA) दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. सर्व विमा कंपन्यांना मानसिक आजारासंबंधी (<a href="https://ift.tt/LVJn5yR Illness) देखील आरोग्य विमा प्रदान करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसंच नवजात बाळांनाही (<a style="color: #0014ff;" href="https://ift.tt/jDwtefu Born Baby) विमा प्रदान सूचना दिल्या आहेत. आयआरडीएने याबाबत सर्क्युलर जारी केलं आहे. 31 ऑक्टोबरपूर्वी सर्व विमा कंपन्यांना मानसिक आजार कव्हर करण्यासाठी नियमांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नवजात बाळांना देखील विमा
आयआरडीएने मानसिक आरोग्य सेवा कायदा 2017 च्या तरतुदींनुसार सर्व विमा कंपन्यांना नियमांचं पालन करण्याच्या सूचना दिल्या आहे. या सर्क्युलरनुसार कोणत्याही अटी शर्तीविना आणि कोणताही वेटिंग टाईम शिवाय नवजात बाळांना देखील विमा प्रदान करण्यास सांगितलं आहे. यामुळे जेनेटिक आजार असलेल्या नवजात बाळांना आणि पोटात असलेल्या अर्भकांना मोठा फायदा होणार आहे. बालकांना कोणताही आजार असो, त्यासाठी आता विमा उतरवता येणार आहे.

यापूर्वी विमा कंपन्या नवजात बाळांसाठी विमा पॉलिसी आणत नव्हत्या. हीच बाब लक्षाच घेऊन भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने सर्क्युलर जारी करुन विमा प्रदान करण्याच्या सूचना दिल्या आहेच. या विम्यामध्ये प्रीमियम ठरवण्याचे अधिकार मात्र विमा कंपन्यांकडेच असणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे नवजात बाळांसंदर्भातल्या विमा पॉलिसीसाठीचा निर्णय तात्काळ लागू करा, असं विमा कंपन्यांना सांगण्यात आलं आहे.

मानसिक आजारांमध्ये वाढ
गेल्या काही वर्षांपासून मानसिक विकाराची समस्या वाढत आहेत. मानसिक विकारामुळे शारीरिक समस्यादेखील निर्माण होतात. मानसिक आजारांचा वयाशी काहीही संबंध नसतो. त्याच्या उपचारासाठी बराच वेळ लागतो आणि खूप पैसेही खर्च होतो. पण अशा आजारांना विमा संरक्षण मिळते हे फार कमी लोकांना माहित असते.

विमा नियामक इर्डाने ऑगस्ट 2018 पासून आरोग्य विम्यांतर्गत मानसिक आरोग्य कव्हर अनिवार्य केलं आहे. इर्डाने सर्व विमा कंपन्यांना मानसिक आजारांवर इतर शारीरिक समस्यांप्रमाणेच उपचार करण्यास सांगितले. मानसिक आजारांसाठी ओपीडी, आयपीडी आणि डिजिटल कन्सल्टेशन कव्हरसह आरोग्य विमा योजना घेणं फायदेशीर ठरतं. अशा योजनांमध्ये रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीचा आणि नंतरचा खर्च, उपचार आणि पुनर्प्राप्ती आणि विविध चाचण्यांचा समावेश होतो.

संबंधित बातमी

<a href="https://ift.tt/w1JrEij Health : 'या' गोष्टी आहेत मानसिक आजाराची लक्षणं, वेळीच सावध व्हा...

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Mental Health Insurance : 31 ऑक्टोबरपूर्वी मानसिक आजारासंबंधी विमा प्रदान करा, IRDA ची सर्व विमा कंपन्यांना सूचनाhttps://ift.tt/XlCu8tW

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या