TICKER
6/recent/my%20zone
Header Ads Widget
Responsive Advertisement
Narak Chaturdashi 2022 : नरक चतुर्दशीला अभ्यंगस्नान कसे करावे? जाणून पूजा विधी, शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व
नरक चतुर्दशीला नरक चौदस, रुप  चौदस किंवा काली चौदस या नावानेही ओळखले जाते. पंचागानुसार दिवाळीच्या आदल्या दिवशी नरक चतुर्दर्शी साजरी केली जाते. या दिवशी उपवासही केले जातात. जाणून घेऊया नरक चतुर्दर्शीचा मुहुर्त, पूजेचा विधी आणि धार्मिक महत्त्व.
नरक चतुर्दशी 2022 व्रत मुहूर्त (Narak Chaturdashi 2022 Shubh Muhurat) :
कृष्ण पक्षाची चतुर्दशी तिथि प्रारंभ : 23 ऑक्टोबर 2022 सायंकाळी 06 वाजून 03 मिनिटांपर्यंत
चतुर्दशी तिथि समापन : 24 ऑक्टोबर 2022 सायंकाळी  05 वाजून 27 मिनिटांपर्यंत
नरक चतुर्दशी व्रत तिथी : 24 ऑक्टोबर 2022, सोमवार
स्नान मुहूर्त : 24 ऑक्टोबर 2022, सकाळी 05:08 - सकाळी 06:31
काली चौदस 2022 तिथि आणि मुहूर्त : 23 ऑक्टोबर 2022, रविवार रात्री 11:42 ते 24 ऑक्टोबर 2022 रात्री : 12:33 पर्यंत
नरक चतुर्दशीच्या दिवशी करा 'हे' काम
या दिवशी भगवान कृष्णाने नरकासूरचा वध केला होता, म्हणून या दिवशी कृष्णाची पूजा केली जाते. नरक चतुर्दशीच्या दिवशी सकाळी उटणे लावून आंघोळ करावी. उटणे लावल्यास त्वचा तजेलदार होते.
नरक चतुर्दशीच्या सांयकाळी घरासमोर दिवे लावावेत. तसेच घरासमोर रांगोळी लावावी, त्यामुळे यमराज प्रसन्न होतात आणि घरात कुणाचाही अकाली मृत्यू होत नाही.
अभ्यंगस्नान कसे करावे?
दिवाळी सणातील अभ्यंगस्नानाला भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्व दिले गेले आहे. अभ्यंगस्नान म्हणजे तेल, उटणे लावून स्नान करणे. नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान केले जाते. 'तेल, उटणे अंगाला लावून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट आणि अहंकाराचे उच्चाटन करायचे. कोकणात अंघोळ केल्यानंतर 'कारेटं' अंगठयाने फोडण्याची प्रथा आजही पाळली जाते. अभ्यंगस्नान झाल्यावर देव आणि आई-वडिलांचे दर्शन घ्यावे. या दिवशी यमतर्पण केल्याने अपमृत्यू टाळता येतो असे सांगितले जाते. सर्वत्र समृद्धी व्हावी याकरिता पणत्या लावण्याची प्रथा आहे. या दिवशी सणाच्या दिवशी करतात तसा स्वयंपाक करून देवाला नैवेद्य दाखवतात.
महत्वाच्या बातम्या :
<a href="https://ift.tt/zN5c8g3 Chaturdashi Diwali 2022 : 'नरकचतुर्दशीला' नरकासुराचा वध का केला जातो? जाणून घ्या यामागची आख्यायिका
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Narak Chaturdashi 2022 : नरक चतुर्दशीला अभ्यंगस्नान कसे करावे? जाणून पूजा विधी, शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्वhttps://ift.tt/bDASLHG
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या