RSV Infection : कोरोना आणि 'या' विषाणूचा एकत्रित संसर्ग घातक, लहान मुलांना अधिक धोका

RSV Infection : कोरोना आणि 'या' विषाणूचा एकत्रित संसर्ग घातक, लहान मुलांना अधिक धोका

<a href="https://ift.tt/joYDy4X and RSV Infection Combination : सध्या जगभरात कोरोनाच्या ( Coronavirus ) ओमायक्रॉन ( Omicron ) प्रकाराच्या एक्सबीबी ( XBB ) या सब व्हेरियंटचा संसर्ग वाढताना दिसत आहे. हा नवा कोरोना सबव्हेरियंट ओमायक्रॉनपेक्षा अधिक संसर्गजन्य असल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. अशातच आता आरोग्य व्यवस्थेसमोर नवं आव्हान उभं राहिलं आहे. थंडीच्या मोसमाला सुरुवात झाली आहे. अशातच आता आरएसव्ही इंफेक्शन (RSV Infection) म्हणजे श्वसननलिकेचा संसर्ग वाढण्याचा धोका आरोग्य तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. कोरोना विषाणू, फ्लू आणि आरएसव्ही संसर्ग एकत्र यांचा एकत्रित संसर्ग धोकादायक ठरु शकतो, असा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.

कोरोना, फ्लू आणि आरएसव्हीचा एकत्रित संसर्ग

अमेरिकेत कोविड19, फ्लू आणि आरएसव्ही यांच्या संमिश्र संसर्गामुळे चिंतेचं वातावरण आहे. विषाणूंचे हे त्रिकूट मुख्यत्वे लहान मुलांना आपला शिकार बनवत आहे. या संमिश्र संसर्ग झाल्यामुळे टेक्सासमध्ये अनेक लहान मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अनेक रुग्ण भरती झाल्याने आता रुग्णालयांमध्ये बेडही शिल्लक नाहीत. यानंतर आता युरोपमध्येही या संसर्गाचा फैलाव होताना दिसत आहे.

देशात चेन्नईमध्ये RSV चा फैलाव

देशात चेन्नईमध्येही या संसर्गाची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. दरम्यान अमेरिकेच्या आरोग्य तज्ज्ञांनी RSV विषाणूच्या मुख्य लक्षणांबद्दल सांगितलं आहे. RSV आणि Covid19 विषाणूच्या संमिश्र संसर्गाची लक्षणे धोकादायक आहेत. अमेरिकेमध्ये गेल्या दोन वर्षांपासून आरएसव्ही संसर्गाची प्रकरणं आढळून येत आहेत. यामध्ये कोरोना आणि ओमायक्रॉन व्हेरियंटच्या संसर्गाने चिंतेत भर घातली आहे. त्यामुळे आरएसव्ही आणि कोरोना या संमिश्र संसर्गाच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढली आहे.

अमेरिकन मीडिया रिपोर्टनुसार, माउंट प्लेजंटमध्ये काम करणारे बालरोगतज्ञ डॉ. गेराल्ड स्टेग यांनी सांगितलं की, कोरोना आणि आरएसव्ही संसर्गामुळे मुलांमध्ये श्वासोच्छवासाचा त्रास सर्वाधिक दिसून येत आहे. हे या दोन्ही विषाणूंच्या संमिश्र संसर्गाचं प्रमुख लक्षण असू शकते.

आरएसव्ही संसर्ग काय आहे?

RSV म्हणजे ह्युमन रेस्पिरेटरी सिंसिटिअल व्हायरस इन्फेक्शन. हा संसर्ग दोन वर्षांपर्यंतच्या मुलांसह वृद्धांमध्येही आढळतो. यामध्ये रुग्णाच्या श्वासनलिकेला सूज येते आणि श्वास घेण्यास त्रास होतो. अधिर गंभीर प्रकरणात न्यूमोनिया आणि ब्रॉन्कायलाइटिसचे होऊ शकतो. RSV संसर्गाची सौम्य आणि फ्लू सारखी लक्षणे दिसू शकतात. आरएसव्ही हा विषाणू संसर्गजन्य आहे.

आरएसव्ही संसर्गाची लक्षणे कोणती आहेत?

हिवाळ्यात फ्लूचे प्रमाण वाढणे सामान्य आहे. पण आधी कोरोना आणि त्यातच आरएसव्ही संसर्ग झाल्याच्या वाढत्या प्रकरणांमुळे आरोग्य तज्ज्ञही चिंतेत आहेत. या तीन विषाणूंच्या संमिश्र संसर्गाची काही सामान्य लक्षणे खालीलप्रमाणे आहेत.

ताप

सर्दी

खोकला

भूक न लागणे

शिंकणे

धाप लागणे

मळमळ

थंडी लागणे

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: RSV Infection : कोरोना आणि 'या' विषाणूचा एकत्रित संसर्ग घातक, लहान मुलांना अधिक धोकाhttps://ift.tt/Nikp8ZI

0 Response to "RSV Infection : कोरोना आणि 'या' विषाणूचा एकत्रित संसर्ग घातक, लहान मुलांना अधिक धोका"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel