TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

World Spine Day 2022 : वाढत्या वयात पाठदुखीची समस्या जाणवतेय? 'या' घरगुती उपायांनी आराम मिळवा

World Spine Day 2022 : वाढत्या वयाबरोबर पाठदुखीची (Spine) समस्येचा त्रास सुरु होणं हे अगदी सामान्य आहे. पण जर ही समस्या खूप वाढली तर हळूहळू याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. तुम्हालाही वारंवार पाठदुखीचा त्रास होत असेल तर अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. याशिवाय काही सोप्या टिप्स वापरून पाठदुखीची समस्याही कमी होऊ शकते. या ठिकाणी आम्ही तुम्हाला पाठदुखीची समस्या कमी करण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय सांगणार आहोत. या उपायांनी तुम्हाला पाठदुखीच्या समस्येपासून लवकरच आराम मिळू शकतो. हे  उपाय नेमके कोणते ते जाणून घ्या.

तेलाने पाठदुखीपासून आराम मिळेल : पाठदुखीच्या समस्येवर मात करण्यासाठी अनेक प्रकारचे तेल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. तुम्हाला जर पाठदुखीच्या दुखण्यापासून आराम मिळवायचा असेल तर लॅव्हेंडर तेल, तिळाचे तेल या तेलाचा वापर करा. यामुळे वेदनांपासून लवकरच आराम मिळेल.

मसाज करा : कमरेच्या स्नायूंमधील वेदना आणि तणाव दूर करण्यासाठी मसाज खूप फायदेशीर ठरू शकतो. यामुळे पाठदुखीच्या समस्येपासून आराम तर मिळतोच पण त्याचबरोबर बॅक फंक्शनदेखील सुधारले जाऊ शकते. मसाज करण्यासाठी तुम्ही कोणतेही चांगले तेल किंवा मलम वापरू शकता. यातून तुम्हाला खूप फायदा होईल.

मीठाच्या पाण्याने अंघोळ करा : पाठदुखीपासून आराम मिळवण्यासाठी मीठाने अंघोळ देखील करू शकता. यामुळे पाठीच्या दुखण्यापासून आराम मिळेल. यातील मॅग्नेशियममुळे दुखण्यापासून आराम मिळतो. यासाठी बाथटबमध्ये गरम पाणी घ्या. त्यात मीठ टाका आणि थोडा वेळ बसू द्या. यामुळे वेदना आणि क्रॅम्पपासून आराम मिळू शकतो.

मेथीचे दाणे वापरा : पाठदुखीची समस्या दूर करण्यासाठी मेथी दाणे किंवा मेथी पावडरचा वापर केला जाऊ शकतो. यासाठी 1 ग्लास कोमट दूध घ्या. त्यात 1 चमचा मेथी दाणे आणि मध घालून प्या. याच्या मदतीने तुम्हाला पाठदुखीपासून आराम मिळू शकतो.

हळदीचा वापर करा : पाठदुखीपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही हळदीचादेखील वापर करूशकता. यासाठी 1 ग्लास दूध घ्या. 1 चमचा हळद घालून प्या. झोपण्यापूर्वी या दुधाचे सेवन केल्यास दुखण्यापासून आराम मिळतो.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/E1PxFwV Oil : मेथीचे तेल वापरा आणि केसगळती थांबवा; जाणून घ्या सोपी पद्धत

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: World Spine Day 2022 : वाढत्या वयात पाठदुखीची समस्या जाणवतेय? 'या' घरगुती उपायांनी आराम मिळवाhttps://ift.tt/DbycdJi

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या