थंडीच्या दिवसात आपल्या मुलांच्या डायटमध्ये हे पाच फूड द्याच, आजारी पडण्याचा धोका कमी

थंडीच्या दिवसात आपल्या मुलांच्या डायटमध्ये हे पाच फूड द्याच, आजारी पडण्याचा धोका कमी

Food For Kids: राज्यात अनेक ठिकाणी हुडहुडी भरायला सुरुवात झाली आहे. थंडीच्या वातावरणात आजारी पडण्याचे प्रमाण वाढते. हिवाळ्यात लहान मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावं देण्याची गरज असते. हिवाळ्यात सर्दी, खोकला, ताप आणि डासांसंबधीत आजार होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे हिवाळ्यात लहान मुलांच्या आरोग्यकडे लक्ष नाही दिलं, तर त्यांना आजार होण्याची शक्यता असते. हिवाळ्यात लहान मुलांना आजारांपासून वाचण्यासाठी त्यांच्या आहाराकडे लक्ष द्यावं लागेल. जेणेकरुन चिमुकल्यांची रोग प्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होईल. हिवाळ्यात चिमुकल्यांना पोषक असा आहार देणं गरजेचं आहे, जेणेकरुन त्यांची रोग प्रतिकारकशक्ती वाढेल. त्यामुळे चिमुकले आजारांपासून दूर राहतील. पाहूयात हिवाळ्यात चिमुकल्यांना आजारांपासून वाचण्यासाठी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करायला हवा. (Healthy winter foods for kids to boost immunity) -

गुळ (Jaggery) -
हिवाळ्यात लहान मुलांना गुळ खायला द्यावा. हिवाळ्यात थंडीचा परिणाम शरीरावर लवकर होतो. त्यामुळे विविध प्रकारच्या समस्या समोर येतात. गुळाचा प्रभाव उष्ण असतो, त्यामुळं गुळाचे सेवन केल्याने शरीरात उष्णता टिकून राहते. तसेच विविध प्रकारच्या इन्फेक्शनसोबत लढण्यास मदत होते. सर्दी खोकला झाल्यास आल्यासोबत गुळाचे सेवन केल्यास आराम मिळतो. हिवाळ्यात लहान मुलांना गुळ खायला दिल्यास त्यांची रोग प्रतिकारक शक्ती वाढेल. त्याशिवाय दुधामध्ये साखरेच्या ऐवजी गुळ टाकून देऊ शकता.

अंडे (Eggs) -
हिवाळ्यात भरपूर थंडी असते त्यामुळे सर्दी व फ्लु होण्याचे प्रमाण अधिक असते. अंड्यातील पिवळ्या बलकामध्ये व्हिटॅमिन D असते. त्यामुळे सर्दी व फ्लू पासून बचाव करण्यास मदत होते. अंड्यामध्ये प्रोटीन, विटामिन, ओमेगा 3 फॅटी अॅसिड आणि मिनरल्स यासारखे पोषक तत्व असतात. थंडीच्या काळात शरीराचे अंतर्गत तापमान कमी असते. हे तापमान वाढवण्यासाठी अंडे मदत करते. म्हणून हिवाळ्यात अंडे खाणे शरीरासाठी अधिक फायदेशीर ठरते. अंड्यामुळे रोग प्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत मिळते.

हंगामी फळं आणि भाज्या  (Fruits And Vegetables)
हिवाळ्यात मुलांच्या डायटमध्ये हंगामी फळं आणि भाज्यांचा समावेश नक्की करा. फळ आणि भाज्यांमध्ये प्रोटीन, विटामिन, कॅल्शियम, फायबर, आयरन आणि एंटीऑक्सीडेंट्स यासारखी पोषक तत्व आहेत. यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते. हिवाळ्यात मुलांच्या आहारात पालक, ब्रोकली, मेथी यासारख्या भाज्यांचा समावेश कराच. त्याशिवाय संत्रा, सफरचंदासारखी हंगामी फळं द्यायला विसरु नका.

ड्राय फ्रूट्स (Dry Fruits)
मुलांच्या आरोग्यासाठी ड्राय फ्रूट्स खूप फायदेशीर ठरतात. त्यामध्ये विटामिन, फॅट और एंटी ऑक्सीडेंट्स यासारखी पोषक तत्व असतात. हिवाळ्यात चिमुकल्यांना बदाम, काजू, अक्रोड आणि अंजीर यासारखी ड्रायफ्रूट्स द्या. यामध्ये एनर्जी मिळेल, त्याशिवाय आजारांपासून बचावही होईल.

तूप (Ghee) -
हिवाळ्यात तूपाचं सेवन करणं आरोग्यासाठी फायद्याचं आहे. मुलांना तूप खाऊ घातल्यामुळे त्यांची रोग प्रतिकारकशक्ती वाढेल. त्याशिवाय डोळे, डायजेशन आणि त्वचासाठीही तूप फायद्याचं आहे.

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: थंडीच्या दिवसात आपल्या मुलांच्या डायटमध्ये हे पाच फूड द्याच, आजारी पडण्याचा धोका कमीhttps://ift.tt/GerxkuQ

0 Response to "थंडीच्या दिवसात आपल्या मुलांच्या डायटमध्ये हे पाच फूड द्याच, आजारी पडण्याचा धोका कमी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel