Tulsi Vivah 2022 : 'या' खास दगडाच्या पूजेने घरात नांदेल सुख-समृद्धी, जाणून घ्या महत्त्व आणि विधी...

Tulsi Vivah 2022 : 'या' खास दगडाच्या पूजेने घरात नांदेल सुख-समृद्धी, जाणून घ्या महत्त्व आणि विधी...

<a href="https://ift.tt/W4JpFqM Pooja Vidhi : हिंदू धर्मामध्ये कार्तिकी एकादशीनंतर तुळशी विवाहाला ( Tulsi Vivah 2022 ) सुरुवात होते. यानंतर तुळशी विवाहानंतर लग्नाचे मुहूर्त सुरु होतात. तुळशी विवाहाच्या दिवशी देवी स्वरूप तुळशीचे भगवान विष्णूंसोबत लग्न लावले जाते. काही ठिकाणी शाळीग्राम आणि तुळशीचे लग्न लावले जाते. काळ्या रंगाचा गोल, गुळगुळीत दगड शाळीग्राम म्हणून ओळखला जातो. शाळीग्राम हा भगवान विष्णूचा अवतार मानला जातो. त्यामुळे तुळशी विवाहाच्या दिवशी शाळीग्राम पूजा केली जाते.

शालिग्रामचे सुमारे 33 प्रकार आहेत, त्यापैकी 24 प्रकारचे शालिग्राम भगवान विष्णूच्या 24 अवतारांशी संबंधित असल्याचं मानलं जातं. ज्या घरामध्ये शालिग्रामची विधीवत पूजा केली जाते, सुख आणि समृद्धी नांदते अशी मान्यता आहे. पण शालिग्रामशी संबंधित काही नियमांचे पालन केले नाही तर अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जाणून घ्या घरात शाळीग्राम ठेवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

शाळीग्राम दगड कुठे सापडतो?

शाळीग्राम जगड नेपाळच्या गंडकी नदीत आढळतो. या दगडावर किड्याच्या आकारासारख्या खुणा असतात. विशेष म्हणजे या खुणा सुदर्शन चक्रासारख्या दिसतात.

शाळीग्रामची पूजा करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

घरात कधीही एकापेक्षा जास्त शाळीग्राम ठेवू नका.

तुमच्या घरात एकापेक्षा जास्त शाळीग्राम असतील तर एकच शाळीग्राम पूजेला ठेवून इतर शाळीग्रामचं पाण्यात विसर्जन करावं.

शालिग्राम कधीही कोणाकडून भेट म्हणून घेऊ नये. शाळीग्राम स्वतःच्या पैशाने विकत घ्यावा. कारण भेटवस्तूंच्या शाळीग्रामच्या पूजेचे फळ भेट दिलेल्या व्यक्तीला जाते.

घरामध्ये शालिग्रामची स्थापना केली असेल तर सात्विक जीवन जगावे. मांस, दारू, जुगार इत्यादी गोष्टींपासून दूर राहावे.

शाळीग्रामची पूजा करताना पांढऱ्या अक्षता ( तांदूळ ) कधीही वापरू नये. अक्षता अर्पण करताना पिवळ्या रंगाच्या अक्षता अर्पण कराव्यात.

शाळीग्रामची नित्यनियमाने पूजा करावी. तसं शक्य नसेल तर त्याचं पाण्यात विसर्जन करावे.

शाळीग्राम नेहमी तुळशीच्या रोपाजवळ ठेवावे. यामुळे भगवान विष्णूसह तुळशीदेवी प्रसन्न होते.

शाळीग्रामला रोज पंचामृताने स्नान घालावे. यामुळे सुख समृद्धी मिळते.

शाळीग्रामची पूजा कशी करावी?

शुभ मुहूर्तावर घरामध्ये शाळीग्रामची स्थापना करा. शाळीग्रामची पूजा नियमितपणे करणे आवश्यक आहे. दररोज विष्णू सहस्त्रनामाचे पाठ करत शाळीग्रामवर पंचामृताने (पंचामृत म्हणजे साखर, दुध, दही, तूप आणि मध) अभिषेक करून त्यानंतर देवाची पंचोपचार (गंध, फुल, धूप-दीप, अक्षता आणि नैवेद्य) पूजा करा. नैवेद्यामध्ये तुळस अवश्य असावी. शाळीग्रामची नेहमी तुळशीसोबतच स्थापना करावी. तुळशीशिवाय शाळीग्रामची पूजा केल्यास दोष लागतो.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Tulsi Vivah 2022 : 'या' खास दगडाच्या पूजेने घरात नांदेल सुख-समृद्धी, जाणून घ्या महत्त्व आणि विधी...https://ift.tt/SFhEWep

0 Response to "Tulsi Vivah 2022 : 'या' खास दगडाच्या पूजेने घरात नांदेल सुख-समृद्धी, जाणून घ्या महत्त्व आणि विधी..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel