Asha sevika Bharti: गोवर संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या एकूण आरोग्यव्यवस्थेचा लेखाजोखा घेतला जात आहे. उपनगरीय रुग्णालयांमधील आरोग्यव्यवस्था, रचना, आरोग्यकेंद्रांची उपलब्धता, तेथील रुग्णांना मिळणाऱ्या वैद्यकीय सुविधांचा दर्जा या आरोग्यसेवांशी निगडित विविध वैद्यकीय सेवांची गुणवत्ता तपासली जात आहे. रिक्तपदांची पूर्तता करण्याचेही आव्हान आहे. करोना संकटानंतर आरोग्य सुविधांसाठी गुणात्मक, संख्यात्मक अशा दोन्ही पातळ्यांवर काम करण्याची गरज वाढली आहे.
source https://maharashtratimes.com/career/career-news/asha-sevika-bharti-2022-various-post-vacant-in-asha-sevika-mumbai-municipal-corporation/articleshow/96242286.cms
0 टिप्पण्या