Baba Vanga Prediction : 'नास्त्रेदमस वुमन' म्हणून प्रसिद्ध असलेल्या बल्गेरियन भविष्यवक्ता बाबा वेंगा यांच्या 2023 च्या भविष्यवाण्यांनी लोकांना घाबरवले आहे. बाबा वेंगा यांनी 2023 साठी केलेल्या भाकितांमध्ये पृथ्वीवर एलियन्सचा हल्ला, अणुहल्ला आणि सूर्यावर त्सुनामीचा इशारा देण्यात आला असून अशा प्रकारच्या काही भविष्यवाण्या केल्या आहेत.

बाबा वेंगा यांनी भविष्यवाणी केली आणि ती खरी ठरली
बाबा वेंगा या बल्गेरियाचे रहिवासी होत्या. त्या जन्मापासूनच आंधळ्या होत्या. त्याची दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली होती. बाबा वेंगा यांनी बल्गेरियातील कोझुह पर्वताच्या रुपीट प्रदेशात आपले जीवन व्यतीत केले. त्या सर्वकाही अनुभवू शकत होते. बाबा वेंगा यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1911 रोजी झाला. त्यांचे खरे नाव वांगेलिया पांडेवा गुश्तारोवा होते, जे नंतर बाबा वेंगा म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांनी 9/11 चा दहशतवादी हल्ला, ब्रेक्झिट यासह अनेक भाकीत केले होते, जे खरे ठरले. 2023 हे वर्ष अंधकारमय आणि शोकांतिकेने भरलेले असेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. बाबा वेंगा यांनी अमेरिकेत झालेल्या 9/11 दहशतवादी हल्ल्याबाबत देखील भाकित वर्तवलं होतं. तसेच आफ्रिका-अमेरिकन वंशाचे बराक ओबामा हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होतील,असा अंदाज देखील बाबा वेंगा यांनी आधीच वर्तवला होता. इतकंच नाही तर कोरोना साधीच्या आजाराबाबत देखील बाबा वेंगा यांनी भविष्यवाणी केली होती आणि ती खरी ठरली. त्यामुळे अनेकांच्या मनात धडकी भरली आहे.

2023 वर्षाची भविष्यवाणी,
बल्गेरियाच्या बाबा बेंगा यांनी त्यांच्या मृत्यूच्या 26 वर्षांपूर्वीच्या तारखेची भविष्यवाणी केली होती, जी पूर्णपणे खरी ठरली. बाबा वेंगा यांच्या समर्थकांचा असा दावा आहे की, त्यांनी 9 नोव्हेंबर 2001 रोजी अमेरिकेवर झालेल्या हल्ल्याचा अंदाज आधीच वर्तवला होता. जर त्यांची भविष्यवाणी गांभीर्याने घेतली तर कदाचित अमेरिकेला आपल्या भूमीवर इतका मोठा हल्ला कधीच पाहायला मिळाला नसता. असे म्हणतात की, बाबा वेंगा यांनी सन 5079 पर्यंत भाकीत केले होते. त्यांच्या मतानुसार आपली पृथ्वीचा 5079 मध्ये नाश होईल. त्याच वेळी, बाबा वेंगा यांनी 2023 वर्षासाठी अनेक भविष्यवाण्या देखील केल्या आहेत, ज्यामध्ये त्यांनी पृथ्वीवर अंधार पसरण्याची आणि विनाशाची भविष्यवाणी केली आहे.

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Baba Vanga Prediction 2023 : एलियन्स हल्ल्यापासून ते त्सुनामीपर्यंत, 2023 साठी बाबा वेंगाची 'ही' भविष्यवाणी, जाणून घ्याhttps://ift.tt/26GxhKC
0 टिप्पण्या