Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, २ जानेवारी, २०२३, जानेवारी ०२, २०२३ WIB
Last Updated 2023-01-02T00:48:58Z
careerLifeStyleResults

Health tips : आयुष्यात वाढणारा तणाव कमी करायचा आहे? स्वतःला 'असे' रिचार्ज करा; नेहमी प्रसन्न राहाल

Advertisement

Health Tips : आजच्या काळात काम आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यात समतोल राखणे खूप कठीण आहे. ताणतणाव हा जवळपास प्रत्येकाच्या जीवनाचा एक भाग बनत चालला आहे. ऑफिसचं काम असो की कौटुंबिक टेन्शन, इच्छा असूनही त्यावर नियंत्रण ठेवणं सोपं नसतं. ताण माणसाच्या वैयक्तिक जीवनावर वर्चस्व गाजवू लागतो आणि त्यामुळे  चिडचिड होऊ लागते. रागात माणसाला प्रत्येक गोष्टीची चिडचिड येते आणि अशावेळी झोप न येण्यासारख्या समस्या सुरू होतात. अशा परिस्थितीत छोटे-छोटे बदल तुमचे जीवन सुधारून ते तणावमुक्त करू शकतात. कामाचा ताण जीवनावर वर्चस्व गाजवण्यापासून कसा रोखता येईल ते जाणून घेऊया.

कामाचा जीवनावर कसा परिणाम होतो

हेल्थ लाइनच्या अहवालानुसार, जर दिवसाचा शेवट थकवा आणि निराशेने झाला असेल तर तुम्ही तणावात आहात असे समजा. याचा अर्थ तणावाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. यामुळे डोकेदुखी, झोप न येणे, पाचन समस्या, जास्त घाम येणे, थकवा आणि अशक्तपणा येतो. ही तणावाची लक्षणे असू शकतात.

स्वतःला असे रिचार्ज करा

व्यस्त जीवनशैलीमुळे अनेकवेळा आपण स्वतःला वेळ देऊ शकत नाही. अशा परिस्थितीत स्वत:ला काही मिनिटे वेळ देणे आवश्यक आहे. हे बर्नआउट टाळण्यास मदत करते. कामाच्या दरम्यान, पॉडकास्ट ऐकणे, मजेदार व्हिडीओ पाहणे आणि आराम करणे यामुळे तणाव कमी होतो. सुट्टीच्या दिवशी फोन आणि लॅपटॉपपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.

जीवनात संतुलन निर्माण करा

जीवनात समतोल निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे तणाव कमी करण्यासाठी आठवडाभर आधीच योजना बनवा जेणेकरून तुम्हाला जास्त विचार करावा लागणार नाही. अगोदर काही काम केल्याने आठवड्याच्या शेवटी कोणतेही दडपण येणार नाही आणि तुम्ही आरामात राहाल.

संवाद साधा

तणावासारखी परिस्थिती खूप गंभीर असते. त्यामुळे यातून बाहेर पडण्यासाठी कुटुंब, मित्र आणि सहकाऱ्यांशी सुसंवाद वाढवा. अशा वेळी हीच माणसं खूप उपयोगी पडतात. तणाव कमी होण्यास मदत होते. तसेच ताण कमी करण्यासाठी कामाचा प्राधान्यक्रम ठरवा, याचा खूप फायदा होईल.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/3u8ah7O Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health tips : आयुष्यात वाढणारा तणाव कमी करायचा आहे? स्वतःला 'असे' रिचार्ज करा; नेहमी प्रसन्न राहालhttps://ift.tt/GvbUSTX