Irregular Periods : महिलांना मासिक पाळी येणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. परंतु दिवसभर धावणे किंवा जास्त टेन्शन घेणे याचा आपल्या शरीरावर खूप वाईट परिणाम होतो. यामध्ये महिलांमध्ये जास्त समस्या दिसून येतात. मासिक पाळी प्रत्येक 28-30 दिवसांनी आणि 3-6 दिवसांच्या दरम्यान येते. जर तुमची मासिक पाळी अनियमित असेल तर तुम्हाला PCOS असू शकते. PCOS च्या इतर काही लक्षणांमध्ये वजन वाढणे, पिंपल्स येणे, केस गळणे आणि बऱ्याच गोष्टी समाविष्ट आहेत. जर तुम्हालाही अनियमित मासिक पाळीचा त्रास होत असेल तर घरात ठेवलेल्या अनेक गोष्टींचे सेवन केल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो.

घरात ठेवलेल्या 'या' गोष्टी खाणे सुरू करा, तुम्हाला फायदा होईल

गूळ : गुळामध्ये सोडियम आणि पोटॅशियम असते, ज्याचा नियमित वापर करून तुमची अनियमित मासिक पाळी बरी करता येते. गूळ नैसर्गिकरित्या गरम असतो. मासिक पाळी उशिरा येण्याची समस्या गुळामुळे दूर होऊ शकते.

हळद : तुम्हाला तुमची मासिक पाळी नियमित करायची असेल तर हळद वेगवेगळ्या प्रकारे वापरून पहा. तुम्ही हळद दुधात मिसळू शकता आणि मिश्रण अधिक चांगलं करण्यासाठी गूळ देखील घालू शकता.

आल्याचा चहा : मासिक पाळी सुधारण्यासाठी आल्याचा चहा सर्वात गुणकारी आहे. आल्यामध्ये जिंजरॉल नावाचे संयुग असते जे शरीरातील जळजळ कमी करते ज्यामुळे मासिक पाळी सुरू होण्यास मदत होते. आल्याचा चहा बनवण्यासाठी पॅनमध्ये 1 कप पाणी आणि किंचित चिरलेलं आलं उकळून घ्या. तीन मिनिटे उकळवा. कप मध्ये गाळून घ्या आणि गरम झाल्यावर प्या. तसेच, रेग्युलर चहादेखील फायदेशीर आहे.

व्हिटॅमिन सीयुक्त फळ : असं म्हटलं जातं की व्हिटॅमिन सी समृद्ध फळे देखील त्यांच्यामध्ये एस्कॉर्बिक ऍसिडमुळे मासिक पाळी नियंत्रित करण्यास मदत करतात. संत्री, किवी, लिंबू, स्ट्रॉबेरी यांसारखी फळे खाऊ शकता. जर तुम्हाला तुमची मासिक पाळी वेळेवर आणायची असेल तर ती नक्कीच खा. तुम्ही एकतर व्हिटॅमिन सी फळे स्नॅक म्हणून घेऊ शकता किंवा त्यांचा ज्यूस पिऊ शकता. जर तुम्ही या सर्व गोष्टी खाण्यास सुरुवात केली तर तुमची अनियमित मासिक पाळी नक्कीच बरी होऊ शकते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/yNAwEkP Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : प्रत्येक वेळी मासिक पाळी उशिरा येते? घरात असलेल्या 'या' गोष्टींचा आहारात समावेश कराhttps://ift.tt/XNyDsIB
0 टिप्पण्या