Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
रविवार, १२ फेब्रुवारी, २०२३, फेब्रुवारी १२, २०२३ WIB
Last Updated 2023-02-12T00:48:22Z
careerLifeStyleResults

Health Tips : निरोगी आणि चमकदार केसांसाठी अश्वगंधा गुणकारी; 'असा' वापर करा, तुम्हाला अनेक फायदे मिळतील

Advertisement

Health Tips : अश्वगंधाबद्दल तुम्ही अनेकदा ऐकले असेल. ही एक औषधी वनस्पती आहे. याचा उपयोग तणाव, थकवा, वेदना, केस गळणे आणि त्वचेच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी केला जातो. आयुर्वेदात अनेक वर्षांपासून अश्वगंधाच्या मुळांचा किंवा पानांचा अर्क वापरला जात आहे. कारण त्यात भरपूर पोषक तत्व असतात. हेच कारण आहे की तज्ञ आता याला केअर प्रॉडक्ट्स आणि सप्लिमेंट्सचा एक भाग बनवत आहेत.

अश्वगंधा तुमच्या केसांची वाढ आणि आरोग्य वाढवते, कारण ते अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे. त्यात दाहक-विरोधी संयुगे देखील असतात, जे तुम्हाला टाळूच्या समस्यांना तोंड देण्यास मदत करतात. अशा प्रकारे तुम्ही केसांसाठी अश्वगंधा वापरू शकता.

पेस्ट बनवा : अश्वगंधा पावडर पाण्यात मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट तुम्ही थेट तुमच्या टाळूवर वापरू शकता. अश्वगंधा पावडर वापरल्याने तुम्हाला त्यातील अँटिऑक्सिडंट्सचा फायदा घेता येईल. ज्यामुळे तुमची टाळू नीट राहू शकते.

हेअर मास्क बनवा : अश्वगंधा हेअर मास्क बनवण्यासाठी एका भांड्यात 2-3 चमचे अश्वगंधा पावडर घ्या आणि त्यात एक चमचा हिबिस्कस पावडर आणि अर्धा कप नारळाचे दूध घाला. त्यानंतर त्याची पेस्ट तयार करून टाळूवर लावा. अर्ध्या तासानंतर केस धुवा.

तुमच्या शैम्पूमध्ये अश्वगंधा मिसळा : तुम्ही तुमच्या शॅम्पूमध्ये अश्वगंधा देखील मिक्स करू शकता. अश्वगंधा पावडर तुमच्या शॅम्पूमध्ये चांगले मिसळा आणि हे मिश्रण तुमच्या टाळूवर काही मिनिटं राहू द्या आणि नंतर तुमचे केस धुवा.

तेलाने लावा : अश्वगंधा तेलाने लावल्याने केसांच्या कोरडेपणाची समस्या दूर होते. अश्वगंधा आणि खोबरेल तेलाचे मिश्रण केस लांब आणि दाट होण्यास मदत करते. तुम्हाला फक्त दोन कप खोबरेल तेल आणि अर्धा कप अश्वगंधा रूट एका बाऊलमध्ये मिक्स करावे लागेल आणि नंतर ते एका काचेच्या बाटलीत ठेवावे. दोन आठवडे सूर्यप्रकाशात ठेवा. तेल तयार झाल्यावर आठवड्यातून दोनदा केसांना आणि केसांच्या मुळांना लावा. याचा वापर केल्याने तुमचे केस वेगाने वाढू लागतील.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/sT8f6Wk Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : निरोगी आणि चमकदार केसांसाठी अश्वगंधा गुणकारी; 'असा' वापर करा, तुम्हाला अनेक फायदे मिळतीलhttps://ift.tt/bzO9lPu