Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, १७ फेब्रुवारी, २०२३, फेब्रुवारी १७, २०२३ WIB
Last Updated 2023-02-17T00:48:23Z
careerLifeStyleResults

Health Tips : तुम्हीही सकाळी रिकाम्या पोटी चहा पिता? वेळीच सावध व्हा, अन्यथा...

Advertisement

Health Tips : आपल्यापैकी अनेकजण हे चहाप्रेमी आहेत. काही लोकांना चहाशिवाय झोपच येत नाही, तर काही जणांना दर तासाला चहा पिण्याची सवय असते. पावसाळ्यात चहाबरोबर गरमागरम भजी खाण्याची गंमत काही औरच. प्रत्येकाचे चहाबरोबर अनेक किस्से आणि आठवणी आहेत. काहींना तर सकाळी डोळे उघडताच हातात चहा लागतो.    पण तुम्हाला माहित आहे का की, रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने तुमच्या पोटावर थेट परिणाम होतो.

चुकूनही रिकाम्या पोटी चहा पिणे आरोग्यासाठी चांगले नाही हे डॉक्टर अनेकदा सांगतात. त्याचे शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात. विशेषत: उन्हाळ्यात रिकाम्या पोटी चहा पिणे टाळावे, अन्यथा त्यात असलेले कॅफिन, अॅलॅन्थाइन आणि थिओफिलिन शरीराला अनेक प्रकारे हानी पोहोचवू शकतात. ज्या लोकांना सकाळी बेडवर बसून चहा प्यायला आवडते, त्यांच्यासाठी दुधाचा चहा खूप हानिकारक आहे.

रिकाम्या पोटी दुधासोबत चहा पिऊ नका

अनेकांना दुधाचा चहा जास्त आवडतो, पण तुम्हाला माहित आहे का की तो शरीरासाठी जास्त हानिकारक आहे. यामुळे तुम्हाला जास्त चिडचिड आणि अस्वस्थ वाटते. रिकाम्या पोटी ग्रीन टी प्यायल्यास उत्तम.

यकृतावर वाईट परिणाम होतो

चहा प्यायल्याने यकृतावर वाईट परिणाम होतो. रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने यकृतातील पित्त रस सक्रिय होतो. त्यामुळे चहा प्यायला लागताच तुम्हाला अस्वस्थ वाटू लागते.

कमी भूक लागते

दुधाच्या चहाप्रमाणे ब्लॅक टी देखील आरोग्यासाठी चांगली नाही. यामुळे तुमच्या शरीरात सूज येते.. अधिक ब्लॅक टी प्यायल्याने भूकही कमी होते.

स्ट्रॉंग चहा पिणे देखील आरोग्यासाठी चांगले नाही

ज्या लोकांना स्ट्रॉंग चहा प्यायला आवडते. त्यांच्यासाठी ही कदाचित वाईट बातमी असू शकते. स्ट्रॉंग चहा पिताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की ते पोटात हायड्रोक्लोरिक ऍसिड तयार करते. यामुळे पोटात जखमाही होऊ शकतात. यावर वेळीच उपचार न केल्यास अल्सरही होऊ शकतो.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, चहाचं सेवन करावं पण ते फार कमी प्रमाणात असावं. तुमच्या लाईफस्टाईलनुसार चहाची वेळ ठरवा.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/WtFmpKd Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : तुम्हीही सकाळी रिकाम्या पोटी चहा पिता? वेळीच सावध व्हा, अन्यथा...https://ift.tt/jpkYmy9