TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

Health Tips : वजन कमी करण्यासाठी 'लिक्विड डाएट'चा प्लॅन करताय? 'या' महत्त्वाच्या गोष्टी आधी जाणून घ्या

Liquid Diet Benefits : वजन कमी करण्यासाठी अनेक लोक तऱ्हेतऱ्हेचे डाएट फॉलो करतात. जिमला जातात, योगा करतात, बाहेरचं खाणं टाळतात. प्रत्येकाची वजन कमी करण्याची पद्धत वेगळी असते. काही भाज्या किंवा फळांच्या आहाराने वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात, तर काही लिक्वीड डाएटची मदत घेतात. आजकाल लोक लिक्विड डाएटला जास्त महत्व देत आहेत. लिक्विड डाएट म्हणजे असं डाएट, ज्यामध्ये फक्त द्रव पदार्थ जसे की, सूप, ज्यूस इ.यांचं सेवन केलं जातं.

जर तुम्हालाही लिक्विड डाएट फॉलो करायचा असेल तर तुमच्यासाठी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की हा डाएट फक्त काही दिवस फॉलो केला जाऊ शकतो. याचं कारण म्हणजे एका आठवड्यानंतर तुम्हाला अशक्तपणा किंवा थकवा जाणवू शकतो. असं मानलं जातं की लिक्विड डाएट आपल्या शरीराला योग्य प्रमाणात पोषक आणि कॅलरीज सप्लाय करत नाही, त्यामुळे जास्त काळ हे डाएट फॉलो करणे योग्य नाही. विशेषतः जर तुम्ही आधीच अशक्त असाल, तर तुम्ही या आहाराबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

पोषक तत्वांची काळजी घ्या

लिक्विड डाएटमध्ये, हे निश्चित केले पाहिजे की लिक्विड अन्नाचे सेवन 1300-1500 kcal च्या दरम्यान असावे. याशिवाय तुम्ही जे काही लिक्विड फूड घेत आहात त्यात प्रथिनांसह सर्व पोषकतत्त्वे मुबलक प्रमाणात असावीत याचीही विशेष काळजी घेतली पाहिजे. कारण पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे अनेक आजार होऊ शकतात. वजन कमी करणे म्हणजे पोषक तत्वांकडे दुर्लक्ष करणे असं अजिबात होत नाही. तुम्ही जो काही आहार घेत आहात, तो पोषक तत्वांनी परिपूर्ण असला पाहिजे हे लक्षात ठेवा.

नको असलेले पदार्थ बाहेर काढण्यासाठी उपयुक्त

लिक्विड डाएटमध्ये कॅलरीज खूप कमी असतात. यामुळेच बहुतेकांना हा आहार खूप आवडतो. लिक्विड डाएटमुळे तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ आपोआप बाहेर पडू लागतात, जे खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही या डाएटचे योग्य पालन केलं तर वजन कमी करण्यासाठी लिक्विड डाएट हा एक चांगला पर्याय असू शकतो.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/iV58uNO Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : वजन कमी करण्यासाठी 'लिक्विड डाएट'चा प्लॅन करताय? 'या' महत्त्वाच्या गोष्टी आधी जाणून घ्याhttps://ift.tt/QafbGh6

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या