Health Tips : मधुमेह, उच्च रक्तदाब हा तुम्हाला तुमच्या जीवनशैलीनुसार होणारा आजार आहे. यात चिंतेची बाब म्हणजे ही लक्षणे वेळीच दिसून येत नाहीत. मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारखे आजार 'सायलेंट किलर' म्हणून ओळखले जातात. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक आजाराप्रमाणेच मधुमेहातही काही लक्षणे दिसून येतात. जरी ते दिसण्यात अगदी सामान्य दिसत आहेत. परंतु ही लक्षणे वेळीच ओळखणे आवश्यक आहे. आज आपण मधुमेहाच्या अशा लक्षणांबद्दल जाणून घेणार आहोत ज्याकडे थोडं जरी दुर्लक्ष केलं तरी गंभीर परिणाम होऊ शकतात.

तोंड कोरडं पडणे

जर सकाळी उठल्यानंतर तुमच्या तोंडाला कोरडेपणा जाणवत असेल आणि ही समस्या सतत होत असेल तर त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. पण, कोरड्या तोंडाची इतर कारणे देखील असू शकतात. मधुमेहाची खात्री करण्यासाठी मधुमेहाची चाचणी करणं गरजेचं आहे.

मळमळ वाटणे

मळमळ वाटणे हे देखील मधुमेहाचे संभाव्य लक्षण आहे. सकाळी उलटी झाल्यासारखे वाटत असेल तर मधुमेहाची समस्या असू शकते. डॉक्टरांचे म्हणणे आहे की सामान्यतः गर्भवती महिलांना उलट्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. पण मधुमेही रुग्णामध्ये डायबेटिक केटोअॅसिडोसिसची समस्या असू शकते.

धूसर दिसणे

सकाळी डोळे उघडल्यावर स्पष्ट दिसत नसेल तर ते मधुमेहाचे लक्षण असू शकते. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे डोळ्यांच्या लेन्सचा आकार थोडा मोठा होऊ शकतो. यामुळे स्पष्ट दिसत नाही.

डोळ्यांत सूज येणे

ज्या लोकांमध्ये रक्तातील साखरेची पातळी जास्त असते. त्यातील द्रव डोळ्यांमधून बाहेर पडतो आणि कधीकधी आत राहतो. त्यामुळे डोळ्यांना सूज येते.

मधुमेह होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्याल?

बऱ्याच लोकांच्या मनात चुकीचा समाज आहे की, मधुमेह हा फक्त अनुवंशिक आहे. आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे आणि व्यायामाच्या अभावामुळे मधुमेह हा कोणालाही होऊ शकतो. मधुमेहाला टाळण्यासाठी अधूनमधून शुगर तपासत राहणे, आहारात कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी करून प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण वाढविणे, दिवसातून एक-दीड तास व्यायाम करणे, आहारात कार्बोहायड्रेट वाढवणारे पदार्थ जसे की, चपाती, भाकरी, भात यांचे प्रमाण कमी कमी करून डाळी, पालेभाज्या, मोड आलेले कडधान्य, फळं इत्यादींचा जास्तीत जास्त समावेश करणे गरजेचे आहे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/xUGD6uV Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : सकाळी उठल्याबरोबर 'ही' लक्षणं दिसतात?; असू शकतो मधुमेहाचा आजार, वेळीच सावध व्हाhttps://ift.tt/4vewYIR
0 टिप्पण्या