Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
रविवार, १९ मार्च, २०२३, मार्च १९, २०२३ WIB
Last Updated 2023-03-19T08:48:43Z
careerLifeStyleResults

Health Tips : आवळा ते स्ट्रॉबेरी हे 6 ज्यूस प्या; व्हिटॅमिन सी कमतरता’ दूर होईल

Advertisement

Vitamin C Rich Juices : शरीरासाठी व्हिटॅमिन सी हे अत्यंत गरजेचं आहे. यामध्ये अनेक पोषक तत्व आहेत जे शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात. व्हिटॅमिन सी हे जीवनसत्व रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास खूप मदत करते आणि अँटिऑक्सिडेंट म्हणून कार्य करते. व्हिटॅमिन सी लोहाचे शोषण करण्यास मदत करते आणि अधिक कोलेजन तयार करण्यास देखील मदत करते. शरीरात व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे, लोहाची कमतरता देखील होऊ शकते. शरीरात लोहाच्या कमतरतेमुळे अॅनिमिया होऊ शकतो. व्हिटॅमिन सी समृद्ध असलेल्या या आरोग्यदायी पेयांबद्दल जाणून घेऊयात.

'हे' निरोगी पेय प्या

1. संत्र्याचा रस : संत्र्याला व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत मानला जातो. जो शरीरात लोहाचे शोषण वाढविण्याचे काम करतो. लोहयुक्त आहारासोबत एक ग्लास संत्र्याचा रस प्यायल्याने शरीरात लोहाचे पोषण वाढण्यास मदत होते. एक कप संत्र्याच्या रसातून शरीराला 124 मिलीग्राम व्हिटॅमिन सी मिळतं.

2. लिंबूपाणी : लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यात नैसर्गिक आम्ल असते, जे शरीराला लोह चांगल्या प्रकारे शोषण्यास मदत करते. दररोज लिंबू पाणी प्यायल्याने शरीरातील लोहाचे प्रमाण वाढण्यास आणि अॅनिमियापासून बचाव करण्यात खूप मदत होते.

3. आवळा रस : आवळ्याचा रस देखील व्हिटॅमिन सी समृद्ध पेय आहे. हे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात आणि लोहाचे शोषण वाढविण्यात मदत करते. आवळा हा एक सुपरफूड आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. याचे नियमित सेवन केल्याने शरीरातील लोहाची कमतरता दूर होऊ शकते.

4. अननसाचा रस : अननसात ब्रोमेलेन असते. हे एक एन्झाइम आहे, जे पचनास मदत करते आणि लोहाचे शोषण सुधारते. लोहयुक्त आहारासोबत एक ग्लास अननसाचा रस प्यायल्याने शरीरातील लोहाचे प्रमाण वाढते आणि अशक्तपणा टाळता येतो.

5. स्ट्रॉबेरी : स्ट्रॉबेरी देखील व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत आहे. हे लोहाचे शोषण सुधारण्यास मदत करू शकते.

6. किवी फळ : किवीमध्ये व्हिटॅमिन सी देखील मोठ्या प्रमाणात असतं. शरीरातील लोहाची कमतरता दूर करण्यासाठी हे उपयुक्त फळ आहे. किवीमध्ये ऍक्टिनिडिन नावाचे एन्झाइम असते, जे लोहाचे पचन करण्यास मदत करते आणि शरीरात त्याचे शोषण वाढवते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/2Ea1pV7 Tips : झटपट वजन वाढवायचंय? आहारात 'या' पदार्थाचा समावेश करा; काही दिवसांतच फरक जाणवेल

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : आवळा ते स्ट्रॉबेरी हे 6 ज्यूस प्या; व्हिटॅमिन सी कमतरता’ दूर होईलhttps://ift.tt/7ACTj6X