Sleeping While Light On: जर तुम्ही रात्री लाईट सुरू ठेऊन झोपत असाल तर आरोग्य तज्ञांच्या मते ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. तरुण-तरुणींनी चांगल्या आरोग्यासाठी आठ तासांची झोप घेणं अत्यंत गरजेचं आहे. एखाद्या व्यक्तीसाठी चांगली झोप ही थेरपीसारखी असते, जी तुमच्या शरीराला संपूर्ण थकव्यापासून आराम देते. शांत झोपेमुळे तुमचा मेंदू व्यवस्थित काम करतो. तसेच शरीर पुन्हा एकदा रिचार्ज होतं, पुन्हा नवी उर्जा प्राप्त करतं. तुमचा मूड चांगला राहतो तसेच अनेक आजारांपासून तुम्ही दूर राहता. म्हणून झोपताना आपण काही खबरदारी पाळली पाहिजे, अन्यथा यामुळे शरीराला अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते.

झोपताना तुम्हीही करु नका या चुका

अनेकांना झोपताना खोलीतील सर्व दिवे बंद करण्याची सवय असते जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. पण काही लोक असं करत नाहीत. काही लोकांना दिवे सुरू ठेवून झोपायला आवडते किंवा काही लोक आळशीपणामुळे दिवे बंद करत नाहीत. पण तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की दिवे लावणे आरोग्यासाठी नुकसानकारक आहे.

Depression : नैराश्य येण्याची शक्यता

निरोगी जीवनशैलीसाठी प्रकाशाची गरज असते, पण अंधाराचीही तेवढीच गरज असते. स्वीडन आणि नॉर्वे सारख्या देशांमध्ये उन्हाळ्याच्या हंगामात सुमारे सहा महिने सूर्य मावळत नाही हे तुम्ही अनेकदा वाचले असेल. त्यामुळे अनेक लोक डिप्रेशनचे बळी ठरतात. आपल्याकडे अनेकांना रात्री झिरो बल्ब सुरू ठेऊन झोपण्याची सवय असते. या झिरो बल्बच्या प्रकाशामुळे तुमच्यात चिडचिडेपणा येऊ शकतो.

अनेक आजारांचा धोका असतो

जर तुम्ही लाईट लावून झोपलात तर तुम्हाला शांत झोप येत नाही. यासोबतच अनेक आजारांचा धोका असतो. जसं की उच्च रक्तदाब, हृदयासंबधित समस्या अशा गोष्टींना सामोरं जावं लागतं. म्हणूनच चुकूनही दिवे लावून झोपू नये.

झोप पूर्ण न झाल्याने थकवा

असं मानलं जातं की रात्री दिवे लावून झोपल्याने झोप पूर्ण होत नाही. त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशी दिसून येतो. यामुळे तुम्हाला ऑफिसची कामे करण्यात अडचण येऊ शकते. ज्यामुळे तुम्ही सुस्त आणि थकल्यासारखे वाटू शकता.

Disclaimer: या लेखात नमूद केलेल्या गोष्टी आणि सूचनांचे पालन करण्यापूर्वी, डॉक्टर किंवा संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.

ही बातमी वाचा:

<a href="https://ift.tt/aKCEJUs Symptoms : लाँग कोविड रुग्णांमध्ये नवीन लक्षण, माणसांचे चेहरे ओळखण्यात अडचण

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips: रात्री लाईट सुरू ठेवून झोपताय....वेळीच सावध व्हा अन्यथा 'हे' गंभीर आजार होऊ शकतातhttps://ift.tt/UFixB7Y
0 टिप्पण्या