Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, ९ मार्च, २०२३, मार्च ०९, २०२३ WIB
Last Updated 2023-03-09T01:48:50Z
careerLifeStyleResults

Health Tips : शरीरातील 'या' सामान्य समस्यांचा थेट हृदयावर परिणाम होतो; 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Advertisement

Health Tips : वाढत्या वयाबरोबर वृद्धत्व येणं ही नैसर्गिक गोष्ट आहे. जसजसं तुमचं वय वाढत जातं तसतसे तुमच्या शरीरात केवळ हार्मोन्समध्येच नाही तर अवयवांच्या कार्यामध्येही अनेक बदल होत असतात. उदाहरणार्थ, हृदय शरीराच्या सर्वात महत्वाच्या भागांपैकी एक आहे. पण वाढत्या वयानुसार हृदयावर अनेक गोष्टींचा परिणाम होतो. ज्यामुळे व्यक्तीला अनेक हृदयविकार होण्याची शक्यता असते. या ठिकाणी, वृद्धत्वाची काही लक्षणं आहेत जी थेट तुमच्या हृदयावर कसा परिणाम करतात ते जाणून घ्या.

वृद्धत्वाची ही लक्षणे थेट तुमच्या हृदयावर परिणाम करतात

तुमचे हृदय वयोमानानुसार, उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. जेव्हा तुमच्या रक्तवाहिन्यांमधून वाहणाऱ्या रक्ताचा दाब सातत्याने खूप जास्त असतो तेव्हा उच्च रक्तदाब होतो. उच्च रक्तदाब कालांतराने वाढतो आणि धमनीच्या भिंतींच्या गुळगुळीत आतील अस्तरांना नुकसान पोहोचवतो, ज्यामुळे अडथळे निर्माण होतात आणि हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. वृद्धत्वामुळे एखाद्या व्यक्तीमध्ये एथेरोस्क्लेरोसिसचा धोका वाढतो. प्लेक तयार झाल्यामुळे रक्तवाहिन्या कडक होऊ शकतात. यामुळे रक्ताची गुठळी होऊ शकते.

'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

वृद्धांमध्ये हृदयाचे ठोके अनियमित होण्याची शक्यता वाढते. याला अॅट्रियल फायब्रिलेशन असेही म्हणतात. WebMD नुसार वृद्ध लोकांमध्ये स्ट्रोकचे प्रमुख कारण आहे. अॅट्रियल फायब्रिलेशनमध्ये रक्ताची गुठळी तयार होण्याचा धोका नेहमीच असतो, जो मेंदूपर्यंत जाऊ शकतो आणि स्ट्रोक होऊ शकतो. अमेरिकन हार्ट असोसिएशन जर्नलनुसार, एनजाइना पेक्टोरिस किंवा डाव्या छातीत दुखणे, सामान्यतः छातीत घट्टपणा, हे वृद्धांमध्ये एक सामान्य लक्षण आहे आणि वाढत्या वयाबरोबर ते वारंवार उद्भवते. कोणत्याही वेदनाशिवाय एंजिना पेक्टोरिसला सायलेंट इस्केमिया म्हणतात. छातीत दाब, जडपणा, घट्टपणा किंवा वेदना अशा समस्या असू शकतात.

हृदयविकाराची लक्षणे कोणती?

अनेक तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते, हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी आपले शरीर अनेक संकेत देते. ज्यामध्ये सर्वात मोठे लक्षण म्हणजे छातीत दुखणे. हृदयविकाराच्या झटक्याची काही विशेष लक्षणे खाली दिली आहेत.

छाती दुखणे

दात किंवा जबडा दुखणे

श्वास घेण्यास त्रास होणे

जोरदार घाम येणे

गॅस निर्मिती

गरगरल्यासारखे वाटणे

अस्वस्थ वाटणे

मळमळ आणि मळमळ वाटणे

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/VKtIWcG Tips : पोटाची चरबीही कमी होईल आणि पचनक्रियाही नीट राहील; सकाळी उठल्याबरोबर ही 3 आसनं करा

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : शरीरातील 'या' सामान्य समस्यांचा थेट हृदयावर परिणाम होतो; 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नकाhttps://ift.tt/SG67gOv