SSC HSC Exam: अहमदनगर जिल्ह्याच्या टाकळी-मानूर येथील दहावीच्या परीक्षा केंद्रावर बुधवारी परीक्षार्थींना कॉपी पुरवणाऱ्या जमावाकडून लाठ्याकाठ्या घेऊन भरारी पथकावर हल्ला करण्यात आला. ते परीक्षाकेंद्रच ताब्यात घेण्याचा धक्कादायक प्रकार विधानसभेतील अजित पवार यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला. परीक्षार्थींना कॉपी पुरवणाऱ्या जमावाने परीक्षाकेंद्रात जबरदस्ती प्रवेश करून भरारी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना धमकावून कॉपी पुरवण्यास मुभा देण्याची मागणी केली होती.
source https://maharashtratimes.com/career/career-news/ssc-hsc-exam-ajit-pawar-demanded-action-in-case-of-10th-12th-paper-leak/articleshow/98749535.cms
0 टिप्पण्या