Baisakhi 2023: बैसाखी 2023 (Baisakhi 2023) हा शीख समुदायासाठी महत्त्वाचा सण. हा सुगीचा सण आहे, जो वैशाख महिन्यात येतो. याला अनेक ठिकाणी वैशाखी (Vaishakhi) असंही म्हणतात. खरं तर वैशाख महिन्यापर्यंत उत्तर भारतात रब्बी पिकं तयार होतात आणि त्यांची काढणी सुरू होते. नवीन पीक घरी आल्याच्या आनंदात, हा सण उत्तर भारतातील दिल्ली, पंजाब, हरियाणा इत्यादी सर्व राज्यांत थाटामाटात साजरा केला जातो.

दरवर्षी मेष संक्रांतीच्या (Mesh Sankranti) दिवशी बैसाखी उत्साहात साजरी केली जाते. असं मानलं जातं की, 1699 मध्ये या दिवशी शिखांचे 10 वे आणि शेवटचे गुरु गोविंद सिंह (Guru Gobind Singh) यांनी पवित्र खालसा पंथाची (Khalsa Panth) स्थापना केली होती. म्हणूनच शीख धर्माशी संबंधित लोकांमध्ये हा सण नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो. यंदा 14 एप्रिलला बैसाखी सण साजरा केला जात आहे. जाणून घेऊयात, बैसाखी व्यतिरिक्त, भारतातील सर्व राज्यांमध्ये नवीन वर्ष कधी आणि किती वेळा साजरं केलं जातं, त्याबाबत सविस्तर...

1 जानेवारी (New Year)

ग्रेगोरियन कॅलेंडर म्हणजेच, इंग्रजी कॅलेंडरनुसार दरवर्षी नवीन वर्ष 1 जानेवारीला साजरं केलं जातं. त्याचा उत्सव केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात पाहायला मिळतो. सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच, 31 डिसेंबरला रात्रीपासूनच नव्या वर्षाचा जल्लोष सुरू होता. सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचं उत्साहात स्वागत केलं जातं.

हिंदू नववर्ष (Hindu Nav Varsh)

हिंदू धर्मातील लोकांमध्ये चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला नवं वर्ष साजरं करण्याची प्रथा आहे. चैत्र नवरात्रीलाही या दिवसापासून सुरुवात होते. या दिवशी ब्रह्मदेवानं विश्वाची निर्मिती केली, अशी हिंदू धर्मात श्रद्धा आहे. इंग्रजी कॅलेंडरनुसार, ही तारीख मार्च-एप्रिल दरम्यान येते.

गुढीपाडवा (Gudi Padwa)

महाराष्ट्रातील मराठी लोकही चैत्र महिन्यात शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून नवं वर्ष साजरे करतात. याला मराठी पाडवा असंही म्हणतात. या दिवशी आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणामध्ये नवं वर्ष उगादी म्हणून साजरं केलं जातं. तर काश्मीरमध्ये हा दिवस नवरे म्हणून साजरा केला जातो.

विशू (Vishu)

मल्याळम कॅलेंडरनुसार, विशूचा सण मेष संक्रांतीच्या दिवशी साजरा केला जातो. केरळमधील लोक हा दिवस नवीन वर्ष म्हणून साजरा करतात. यंदा हा सण 14 एप्रिलला म्हणजे, आजच साजरा केला जाणार आहे.

पुथंडु (Puthandu)

पुथंडू किंवा पुथुरुषम जे तामिळ नववर्ष म्हणून साजरं केलं जातं. ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार, हा दिवस बहुतेक वेळा 14 किंवा 15 एप्रिल रोजी साजरा केला जातो.

पोयला बैशाख (Poila Baishakh)

बंगाली समाजातील लोक पोयला बैशाख हा दिवस नवीन वर्ष म्हणून साजरा करतात. या दिवशी लोक एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात आणि हा दिवस कुटुंबातील सदस्य आणि मित्रांमध्ये साजरा करतात. या दिवशी घरातील सर्व लोक नवीन कपडे घालून पूजा करतात आणि विविध प्रकारचे पारंपारिक पदार्थ तयार करतात. यावर्षी पोयला बैशाख किंवा बंगाली नववर्ष शनिवार, 15 एप्रिल 2023 रोजी साजरं केलं जाईल.

जैन नववर्ष

जैन नववर्ष दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी साजरं केलं जातं. वीर निर्वाण संवत (Vira Nirvana Samvat) नुसार, हा वर्षाचा आरंभ मानला जातो. याच दिवशी महावीर स्वामींना निर्वाण मिळालं, असं मानलं जातं. त्याला वीर निर्वाण संवत असंही म्हणतात.

नवरोज

नौरौज किंवा नवरोज हे इराणी नववर्ष म्हणून साजरं केलं जातं. हिजरी शमसी कॅलेंडरचं नवं वर्ष या वेळेपासून सुरू होतं. या कॅलेंडरनुसार दरवर्षी 20 किंवा 21 मार्चपासून नवरोज सुरू होतो. याला पर्शियन नववर्ष असंही म्हणतात.

इस्लामिक नवीन वर्ष (Islamic New Year)

इस्लामिक नववर्षाला हिजरी नववर्ष असंही म्हणतात. जे मोहरम महिन्यापासून सुरू होतं. इस्लामिक नववर्षाची तारीख दरवर्षी बदलते. इस्लामिक हिजरी कॅलेंडर ग्रेगोरियन कॅलेंडरपेक्षा सुमारे 11 दिवस लहान आहे.

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Baisakhi 2023 पासून सुरू होतं शीख समुदायाचं नववर्ष; भारतातील सर्व राज्यांमध्ये कधी साजरं केलं जातं नवीन वर्ष?https://ift.tt/rfuwE59
0 टिप्पण्या