TICKER
6/recent/my%20zone
Header Ads Widget
Responsive Advertisement
Benefits of Walking: आठवड्यातून इतकी पावलं चालल्याने मृत्यूचा धोका होईल कमी, काय म्हटलंय संशोधनात?
Benefits of <a href="https://ift.tt/h30LCzF> : सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे बहुतेक लोकांच्या आहारात बदल झाल्याचं दिसून येतं. यासोबत काम करण्याच्या पद्धतीतही अनेक बदल होताना दिसून येत आहेत. त्यात रात्री आणि दिवसपाळी यानुसार काम करावं लागतं. म्हणून दिवसभर बैठे काम काम करण्यात जास्त वेळ जात असतो. यासोबत गृहिणी असाल तर घरातचं जास्त वेळ घालवावा लागतो. तर कधी टीव्हीसमोर बसून मालिका बघण्यात दिवस निघून जात असतो. अशा दिनचर्येत स्वत:साठी वेळ काढून काही वेळ पायी चालणं फायद्याचं (Benefits of Walking) असतं. कारण आठवड्यातून काही पाऊल चालणं हे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असतं. याविषयी नुकतच एक संशोधन करण्यात आलं आहे. या संशोधनात असा दावा करण्याता आला आहे की, कोणत्या पद्धतीने पायी चालण्याचा व्यायाम केला तर मृत्यूचा धोका कमी होऊ शकतो. याबाबत सविस्तर जाणून घेऊया...
आठवड्यातील इतके दिवस पायी चालणं आरोग्यदायी
क्योटो विद्यापीठ आणि कॅलिफोर्निया विद्यापीठ यांच्या एका संयुक्त संशोधनानुसार, तुम्ही आठवड्यातून कमीत कमी दोन दिवस पायी चालण्यासाठी वेळ काढायला हवा. यादरम्यान 8,000 पावलं चालण्याची आवश्यकता आहे. यामुळे मृत्यूचा धोका कमी होतो, असा दावा संशोधनात करण्यात आला आहे. या अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, हा व्यायाम आठवड्यातून तीन किंवा सात वेळा 10 हजार पावलं चालण्यासारखं आहे. तसेच, एका आंतरराष्ट्रीय मेडिकल जर्नलमधील अभ्यासात असं म्हटलंय की, आठवड्यात जास्तीत जास्त वेळा किंवा एक वेळा जरी पायी चाललं तरी मानवी आरोग्याला सारखाच फायदा मिळत असतं.
किती लोकांवर सर्व्हे करण्यात आला?
या परदेशी विद्यापीठातील संशोधनानुसार, तुमच्याकडे जर वेळ आणि ऊर्जा असेल तर आठवड्यातून फक्त दोन दिवस पायी चालले तरी आरोग्याला फायदेशीर आहे. या संशोधनासाठी एक सर्व्हे करण्यात आला होता. या संयुक्तपणे अभ्यास करण्यात आलेल्या संशोधसाठी 3 हजार 101  लोकांवर सर्व्हे करण्यात आला होता. हा सर्व्हे अमेरिकेतील वयस्कर नागरिकांवर करण्यात आला होता. 
पायी चालणाऱ्यांमध्ये मृत्यूचा धोका कमी 
या अभ्यासानुसार, जी लोक आठवड्यातून एक-दोन वेळा पायी चालत नाहीत यांच्यापेक्षा जी लोक आठवड्यातून एक किंवा दोन वेळा कमीत कमी 8 हजार 000 पावलं चालतात, त्यांच्यात 10 वर्षानंतर मृत्यूचा धोका जवळपास 14 टक्यांनी कमी झाल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे प्रत्येकाने आठवड्यातून काही पाऊल चालण्यासाठी आवर्जून वेळ काढायला हवा. यामुळे तुमचं आरोग्या चांगलं राहिल आणि आजारी पडण्याची शक्यता कमी असते.
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Benefits of Walking: आठवड्यातून इतकी पावलं चालल्याने मृत्यूचा धोका होईल कमी, काय म्हटलंय संशोधनात?https://ift.tt/g67iLfx
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या