Deoxa Indonesian Channels

lisensi

Advertisement

Advertisement
रविवार, २ एप्रिल, २०२३, एप्रिल ०२, २०२३ WIB
Last Updated 2023-04-02T00:48:36Z
careerLifeStyleResults

Health Tips : 'या' कारणांमुळे डायबिटीजच्या रुग्णांसाठी कारलं आहे रामबाण उपाय; जाणून घ्या फायदे

Advertisement

Diabetes Treatment : मधुमेह (Diabetes) हा लाईफस्टाईलशी संबंधित आजार आहे. तुमची लाईफस्टाईल जर बिघडली असेल तर मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते.  ज्यांचे जेवण योग्य नाही, वेळेवर नाही त्यांना मधुमेह होण्याचा धोका जास्त असतो. तसेच, ज्या लोकांना लठ्ठपणा आहे त्यांच्यामध्ये देखील मधुमेहाची लक्षणं दिसतात. अशा वेळी  मधुमेह झाल्यानंतर आहारावर नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचे आहे.

मधुमेह झाल्यानंतर रुग्णाने योग्य आहार घेतला नाही तर त्याचे शरीरातील अनेक अवयवांवर नकारात्मक परिणाम होऊ लागतात. त्यांचे नुकसान होण्याचा धोका आहे. मधुमेहापासून बचाव करण्यासाठी कारलं फार फायदेशीर मानलं जातं. मधुमेह झालेल्या रूग्णांनी आपल्या आहारात कारल्याचा रस आणि भाज्यांचा समावेश केल्यास त्यांना लवकर आराम मिळू शकतो. डायबिटीजमध्ये कारल्याचा फायदा नेमका कसा होतो हे जाणून घेऊयात.

...यामुळे मधुमेह होतो

जेव्हा शरीराच्या स्वादुपिंडात इन्सुलिनची कमतरता असते किंवा स्वादुपिंड इन्सुलिन तयार करणे अजिबात थांबवते तेव्हा मधुमेहाचा धोका वाढतो. इन्सुलिनचे काम रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणे आहे. कमी इन्सुलिनमुळे रक्तातील साखरेची म्हणजेच ग्लुकोजची पातळी वाढू लागते. या स्थितीला मधुमेह म्हणतात. इन्सुलिनबद्दल बोलायचे झाले तर ते एक प्रकारचे हार्मोन आहे. जी शरीरातील पाचक ग्रंथीपासून बनते.

मधुमेहामध्ये कारल्याचा उपयोग कसा होतो?

कारल्यामध्ये अँटीबायोटिक, अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. याशिवाय त्यात मधुमेहविरोधी गुणधर्मही आढळतात. यामध्ये असलेले चरेंटिन रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करण्याचे काम करते. पॉलिपेप्टाइड-पी किंवा पी-इन्सुलिन देखील कारल्यामध्ये आढळते. हे साखर नैसर्गिकरित्या नियंत्रित ठेवण्याचे काम करते.

'अशा' प्रकारे तुम्ही कारलं खाऊ शकता

मधुमेहाच्या रूग्णांसाठी कारल्याचा रस देखील खूप फायदेशीर मानला जातो. कारल्याचा रस तयार करण्यासाठी ताजे कारले सोलून घ्या. त्यानंतर त्याचे छोटे तुकडे करून अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा. नंतर कारले ज्युसरमध्ये टाका. त्यात थोडा लिंबाचा रस आणि अर्धा चमचा मीठ घाला. यानंतर तुम्ही त्याचे सेवन करू शकता. याशिवाय कारल्याची भाजीही खूप फायदेशीर आहे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/73wXurG Tips : झटपट वजन वाढवायचंय? आहारात 'या' पदार्थाचा समावेश करा; काही दिवसांतच फरक जाणवेल

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : 'या' कारणांमुळे डायबिटीजच्या रुग्णांसाठी कारलं आहे रामबाण उपाय; जाणून घ्या फायदेhttps://ift.tt/NijQJ4y