Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, ११ एप्रिल, २०२३, एप्रिल ११, २०२३ WIB
Last Updated 2023-04-11T10:49:01Z
careerLifeStyleResults

Tomato Ketchup :  टोमॅटो केचप खाणं टाळा; अन्यथा आरोग्यावर होईल वाईट परिणाम

Advertisement

Tomato Ketchup :  अनेकांना पिझ्झा, बर्गर आणि फ्रेंच फ्राइजसोबत टोमॅटो (Tomato) केचप खाण्यची आवड असते. टोमॅटो केचपचा टँगी फ्लेवर अनेकांना आवडतो. पण टोमॅटो केचप जास्त खाल्यानं तुमच्या आरोग्यावर (Health Tips) वाईट परिणाम होईल. टोमॅटो केचप खाल्ल्यानं शरीरावर काय परिणाम होतो (Side Effects Of Tomato Ketchup)? याबद्दल जाणून घेऊयात...

टोमॅटो केचप म्हणजेच टोमॅटो सॉस खाल्ल्याने शरीरात सोडियम आणि साखरेचे प्रमाण वाढते. यामुळे टोमॅटो केचप खाणं आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते.

टोमॅटो  केचप बनवण्यासाठी केमिकल्स आणि प्रिझर्वेटिव्ह्जचा वापर केला जातो, ज्यामुळे मधुमेह, लठ्ठपणा यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे टोमॅटो  केचप जास्त खाणे टाळावे.

टोमॅटो केचपमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. तसेच त्यामध्ये साखरेसोबत भरपूर मीठ असते. जास्त मिठामुळे उच्च रक्तदाबाचा धोका निर्माण होतो. केचप हा आम्लयुक्त म्हणजेच अॅसिडीक पदार्थ आहे.यामुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या उद्भवू शकतात.

टोमॅटो केचप बनवण्यासाठी डिस्टिल्ड व्हिनेगर आणि फ्रक्टोज शुगर जास्त प्रमाणात वापरली जाते. यासोबतच रेग्युलर कॉर्न सिरप आणि कांद्याची पावडरही वापरली जाते. हे GMO कॉर्नपासून बनवले जाते. ज्यामध्ये भरपूर केमिक्स वापरली जातात. त्यामुळे ते आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे सांगितले जाते.

टोमॅटो केचपमध्ये प्रथिने, फायबर किंवा खनिजे नसतात. साखर आणि सोडियमचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे किडनीवरही परिणाम होऊ शकतो.

टोमॅटो केचप बनवण्यासाठी सर्व प्रथम टोमॅटो  गरम पाण्यात टाकून ते उकळले जाते. यानंतर त्याच्या बिया आणि कातडे काढून त्याला शिजवले जातात. या संपूर्ण प्रक्रियेस अनेक तास लागतात. त्यामुळे टोमॅटोचे पोषक तत्व नष्ट होतात. त्यामुळे जर तुम्हाला टोमॅटो आवडत असेल तर तुम्ही टोमॅटो केचप ऐवजी टोमॅटो कापून खाऊ शकता. तसेच टोमॅटो पासून विविध पदार्थ घरी बनवू शकता.

टोमॅटो सूप, टोमॅटोची भाजी, टोमॅटो टाकून केलेलं सॅलड, टोमॅटोची चटणी इत्यादी टोमॅटोपासून तयार करण्यात आलेले पदार्थ तुम्ही खाऊ शकता.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या इतर बातम्या :

<a href="https://ift.tt/lomNszA Tips : फळे आरोग्यासाठी फायदेशीर, पण दिवसाच्या 'या' वेळी खाल्ल्यास होतील गंभीर परिणाम; वाचा सविस्तर

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Tomato Ketchup :  टोमॅटो केचप खाणं टाळा; अन्यथा आरोग्यावर होईल वाईट परिणामhttps://ift.tt/o824jTF