Health Tips : दमा हा देशभरात सामान्य आजार झाला आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक वर्ग त्याला बळी पडत आहे. यामुळे दम्याने त्रस्त असलेल्या लोकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. त्यामुळे खोकला, धाप लागणे, छातीत दुखणे अशा अनेक समस्या उद्भवू लागतात. वैद्यकीय उपचारादरम्यान दम्यापासून बचाव करण्यासाठी इनहेलरचा वापर केला जातो. पण, दमा टाळण्यासाठी यावर उपचार नेमके काय या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.

दम्यावर उपचार काय?

या संदर्भात डॉ. अभिजित आहुजा, पल्मोनोलॉजिस्ट यांनी महत्त्वाची माहिती सांगितली आहे. ते म्हणतात की, "दमा हा एक फुफ्फुसाचा विकार आहे ज्यामुळे वायुमार्ग अरुंद होतो आणि अवरोधित होतो. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. त्यामुळे विलंब न करता उपचार घेणे अत्यावश्यक आहे."

दम्याची लक्षणे कोणती?

छातीत घरघर होणे

थकवा जाणवणे

खोकला येणे

छाती गच्च वाटणे.

दम्यावर वेळेवर उपचार न केल्यास दम्यामुळे देशात मृत्युदर वाढू शकतो. परागकण, धुलीकण, पक्ष्यांची पिसे, धूर आणि प्रदूषण हे दम्यास कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे विलंब न करता उपचार घेणे अत्यावश्यक आहे. ही लक्षणे केवळ औषधोपचारानेच नियंत्रित केली जाऊ शकतात.

दम्यावरील उपचार खालीलप्रमाणे

दम्याची लक्षणे व्यवस्थापित करण्यासाठी औषध लिहून दिली जातात. स्वत: च्या मनाने औषधोपचार करू नये कारण असे करणे धोकादायक ठरु शकते.

ब्रोन्कोडायलेटर्स वापरा जी फुफ्फुसातील स्नायूंना आराम देऊन आणि श्वासनलिका (ब्रॉन्ची) रुंद करून श्वासोच्छवास सुलभ करण्यास फायदेशीर ठरतात. ते दम्याच्या लक्षणांचा सामना करण्यास मदत करू शकतात.

एखाद्याला इंजेक्शनचा सल्ला दिला जाऊ शकतो. गंभीर दमा झाला तर रुग्णाला बायोलॉजिक थेरपी नावाची औषधे असलेले इंजेक्शन्स दिली जातात. हे दम्याच्या लक्षणांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकतात. या औषधांचा प्रत्येकाला सल्ला दिला जात नाही.

ब्रोन्कियल थर्मोप्लास्टी हा शस्त्रक्रियेचा प्रकार आहे ज्याची शिफारस दमा रुग्णांसाठी डॉक्टर करू शकतात.

दमा असलेल्या व्यक्तीला फुफ्फुसाची क्षमता सुधारण्यासाठी श्वासोच्छवासाचा व्यायाम करणं फायदेशीर ठरेल.

संतुलित आहाराचे पालन करा. चांगला आहार तुमच्यासाठी आवश्यक असेल. जास्त चरबी आणि जास्त कॅलरीयुक्त पदार्थ खाणे टाळा. मिठाई, मिष्टान्न, कार्बोनेटेड पेयांरासून दूर रहा.

दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम करा त्यामुळे निरोगी राहण्यास मदत होईल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.)

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/618SOHe Tips : 8 तास झोप घेऊनही दिवसभरात झोप येते? असू शकतात हायपरसोमनियाची लक्षणं; वेळीच सावध व्हा

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : दम्याची लक्षणं जाणवतायत? काळजी करू नका; 'हे' उपचार जाणून घ्याhttps://ift.tt/1YH2ti7
0 टिप्पण्या