India Post Jobs 2021: पोस्टात नोकरीची संधी; GDS भरती अर्जांसाठी मुदतवाढ Rojgar News

India Post Jobs 2021: पोस्टात नोकरीची संधी; GDS भरती अर्जांसाठी मुदतवाढ Rojgar News

India Post GDS Recruitment 2021: टपाल विभागात (India Post) नोकरीच्या संधीची वाट पाहणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. भारतीय टपाल खात्याने ग्रामीण डाक सेवक (India Post GDS Recruitment) भरती 2021 साठी अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. जर तुम्ही दहावी उत्तीर्ण आहात आणि सरकारी नोकरी (Govt Jobs for 10th Pass) करण्यास इच्छुक आहात तर या भरतीसाठी अर्ज करू शकता. ऑनलाइन अर्जांसाठी मुदत २६ मे होती, ती आता वाढवून २९ मे २०२१ करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोस्टल सर्कल अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण डाक सेवक ब्रँच ऑफिसेसमध्ये ब्रँच पोस्ट मास्टर (BPM), असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर (ABPM)/ ग्रामीण डाक सेवक (GDS) च्या एकूण २,४२८ पदांची भरती होत आहे. शैक्षणिक पात्रता मान्यता प्राप्त शालेय शिक्षण मंडळातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक. दहावीत गणित, स्थानिक भाषा आणि इंग्रजी विषयात उत्तीर्ण असणे आवश्यक. दहावीपर्यंत स्थानिक भाषेचा अभ्यास केलेला असणे अनिवार्य. निवडीसाठी दहावीच्या गुणांच्या आधारे मेरिट लिस्ट तयार होणार आहे. मात्र दहावीपेक्षा अधिक शैक्षणिक योग्यता असली तरीही दहावीचेच गुण मेरिटसाठी ग्राह्य धरले जाणार. तांत्रिक पात्रता - मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून ६० दिवसांचे बेसिक कॉम्प्युटर ट्रेनिंग सर्टिफिकेट अनिवार्य. - ज्या उमेदवारांनी दहावी किंवा बारावी किंवा उच्च शिक्षणात कॉम्प्युटर एका विषयाच्या रुपात अभ्यासला असेल, त्या उमेदवारांना कॉम्प्युटरच्या बेसिक माहितीच्या सर्टिफिकेट अनिवार्यतेतून सवलत मिळेल. वयोमर्यादा किमान १८ वर्षे आणि कमाल ४० वर्षे वयोमर्यादा. वयाची गणना २७ एप्रिल २०२१ पासून होईल. महत्त्वाच्या तारखा अर्ज सुरु होण्याची तारीख - २७ एप्रिल २०२१ अर्ज करण्याची आणि अर्ज शुल्क भरण्याची अखेरची मुदत - २९ मे २०२१ महाराष्ट्र सर्कलसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अधिक माहितीसाठी ०२२-२२६२६२१४ या क्रमांकावर किंवा gdsrectt.mah@gmail.com या इमेलवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3fsHKgw
via nmkadda

0 Response to "India Post Jobs 2021: पोस्टात नोकरीची संधी; GDS भरती अर्जांसाठी मुदतवाढ Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel