Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, २२ जानेवारी, २०२२, जानेवारी २२, २०२२ WIB
Last Updated 2022-01-22T06:01:04Z
Rojgar

Corona Effect: २०२२ मध्ये बेरोजगारांची संख्या २०.७ कोटींपर्यंत पोहोचेल- रिपोर्ट

Advertisement
Corona Effecr: करोनामुळे जगभरात आतापर्यंत अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. असाच फटका भविष्यातही बसणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. २०२३ पर्यंत जागतिक स्तरावर बेरोजगारांची संख्या प्री-कोविड पातळीच्या वर राहील असा अंदाज इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन (ILO) ने वर्तविला आहे. या वर्षात म्हणजेच २०२२ मध्ये जगातील बेरोजगारांची संख्या २०.७ कोटी असेल. ही संख्या २०१९ च्या तुलनेत २.१ कोटी अधिक आहे. जिनिव्हा येथील यूएन एजन्सीने २०२२ मध्ये जगभरातील रोजगाराबद्दल चिंता व्यक्त केली आहे. आयएलओच्या अहवालानुसार,जागतिक स्तरावर कामाच्या तासांमध्ये घट झाली. ही घट २०१९ च्या चौथ्या तिमाहीच्या तुलनेत ५.२ कोटी पूर्ण रोजगार इतकी आहे. मे २०२१ मध्ये ही कमतरता २.६ कोटी इतकी असण्याचा अंदाज वर्तविण्यात येत होता. जागतिक कामगार बाजारांवर करोना प्रादुर्भावाचा मोठा परिणाम झाला आहे असे आयएलओच्या ग्लोबल एम्प्लॉयमेंट अँड सोशल आउटलुक ट्रेंड्स रिपोर्ट २०२२ मध्ये म्हटले आहे. जागतिक बेरोजगारी किमान २०२३ पर्यंत करोनापूर्व पातळीच्या वर राहील असे यात म्हटले आहे. भारतात बेरोजगारी करोना काळाचा परिणाम भारतातही पाहायला मिळत आहे. भारतात देखील बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. याबाबत केंद्रापासून राज्य सरकारांपर्यंत चिंता व्यक्त केली जात आहे. करोना महामारीमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार देऊ शकत नाहीत आणि केंद्र सरकारने याची जबाबदारी घेतली पाहिजे असे राज्यांचे मत आहे. तर अनेक योजनांच्या माध्यमातून देशातील बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. केवळ सरकारी नोकऱ्यांचे आकडे न पाहता देशातील पर्यायी आणि असंघटित क्षेत्रातील रोजगार संधींबाबतही काळजी घेतली पाहिजे असे केंद्राने म्हटले आहे.


source https://maharashtratimes.com/career/career-news/covid19-effect-globally-the-number-of-unemployed-will-reach-207-million-this-year-reports-the-international-labor-organization/articleshow/89052971.cms