CRPF AC Recruitment 2021:असिस्टंट कमाडंट पदासाठी भरती,५६ हजार ते दीड लाख पगार Rojgar News

CRPF AC Recruitment 2021:असिस्टंट कमाडंट पदासाठी भरती,५६ हजार ते दीड लाख पगार Rojgar News

AC :सीआरपीएफ असिस्टंट कमांडंट पदाच्या भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय रिझर्व दल (CRPF)ने केंद्रीय गृहमंत्रालयाच्या भरती योजनेनुसार असिस्टंट कमांडंट भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर केले आहेत. सीआरपीएफच्या नोटिफिकेशनुसार नाागरी/इंजिनियर ट्रेड ७ मध्ये लेव्हल १० साठी २५ पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये १३ पद ही खुल्या वर्गासाठी आहेत. ओबीसी उमेदवारांसाठी ६ पद, एससीसाठी ३ पद, एसटीसाठी १ पद आणि आर्थिक मागास उमेदवारासाठी २ पद आरक्षित आहेत. यासाठी ५६ हजार ते १ लाख ७७ हजार ५०० रुपयांपर्यंत पगार मिळेल. इच्छुक उमेदवार सीआरपीएफची अधिकृत वेबसाइट crpf.gov.in वर पाहू शकतात. यावर ऑनलाइन अर्ज करु शकतात. सीआरपीएफ असिस्टंट कमांडंट भरती २०२१ साठी ऑनलाइन प्रक्रिया ३० जूनपासून सुरु होणार आहे. उमेदवार २९ जुलै २०२१ पर्यंत अर्ज ऑनलाइन पाठवू शकता. ऑनलाइन अर्ज करताना उमेदवाराला ४०० रुपये शुल्क भरावा लागेल. हे पेमेंट ऑनलाइन माध्यमातून करावे लागेल. अनुसूचित जाती, जमाती आणि महिला उमेदवारांना शुल्कातून सवलत देण्यात आली आहे. पात्रता कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा उच्च शिक्षण संस्थेतून कोणत्याही सिविल इंजिनियरिंगमध्ये पदवी असलेले उमेदवार अर्ज करु शकतात. उमेदवारांचे अर्ज करतानाचे वय ३५ वर्षांपेक्षा अधिक नसावे. आरक्षित वर्गासाठी वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे. निवड प्रक्रिया सीआरपीएफ असिस्टंट कमांडंट २०२१ च्या उमेदवारांची निवड शारीरिक मानक परीक्षा (पीएसटी), शारीरिक दक्षता परीक्षा(पीएसटी), लेखी परीक्षा, कागदपत्र पडताळणी आणि विस्तृत चिकित्सा परीक्षण (डीएमई) च्या आधारे केली जाणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3h3KmBl
via nmkadda

0 Response to "CRPF AC Recruitment 2021:असिस्टंट कमाडंट पदासाठी भरती,५६ हजार ते दीड लाख पगार Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel