Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, २१ जून, २०२१, जून २१, २०२१ WIB
Last Updated 2021-06-21T06:47:03Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

ICAI CA July Exam 2021:प्रवेश पत्र,परीक्षेची तारीख जाणून घ्या Rojgar News

Advertisement
ICAI CA July :इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया (ICAI) चार्टर्ड अकाऊंट्सची (CA)अंतिम परीक्षा जुलै २०२१ मध्ये होणार आहे. यासाठी लवकरच जाहीर होणार आहे. सीए प्रवेश पत्र अधिकृत वेबसाइट icaiexam.icai.org वर जाहीर केले जाणार आहे. जे उमेदवार परीक्षेस बसले आहेत त्यांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन लॉग इन / रजिस्टर टॅबवर क्लिक करा आाणि तिथून हॉल तिकीट डाऊनलोड करा. यासााठी तुम्हाला तुमचा ब्रॅंच लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकावा लागेल. तुमची माहिती भरल्यानंतर एक नवी विंडो खुली होईल. उमेदवारांना या विंडोत प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी एक लिंक मिळेल. ICAI CA फायनल आणि CA इंटरमीडिएट कार्यक्रमांसाठी जुन्या आणि नव्या अभ्यासक्रमाअंतर्गत विद्यार्थी ५ जुलैपर्यंत परीक्षा देऊ शकतात. इंश्यूरन्स रिस्क मॅनेजमेंट(IRM) टेक्निक परीक्षा आणि आंतरराष्ट्रीय कराधान सहित योग्यतेनंतर अभ्यासक्रमासाठी (PQC) साठी असेसमेंट टेस्ट (INTT–AT) देखील ५ जुलैपासून सुरु होईल. ICAI CA फाउंडेशन परीक्षा २४ जुलै ते ३० जुलै २०२१ दरम्यान होणार आहे.इंटरमीडिएट परीक्षा (IPC आणि नवीन) ६ जुलै ते २० जुलैपर्यंत आयोजित केली जाणार आहे. जुन्या आणि नवीन अभ्यासक्रमांसाठी ICAI CA अंतिम परीक्षा ५ ते १९ जुलै दरम्यान होणार आहे. इन्शूरन्स रिस्क मॅनेजमेंट (IRM), पोस्ट क्वालिफिकेशन कोर्स (PQC)परीक्षा, मॉड्यूल १ ते ५ साठी ५,७,९ आणि ११ जुलैला होणार आहे. सीए अंतिम परीक्षा २०२१ साठी प्रवेश पत्रामध्ये उमेदवाराचे नाव, पत्ता, रोल नंबर, परीक्षेचे केंद्र आणि वेळ, नोंदणी क्रमांक, मोबाइल नंबर, परीक्षेत पालन करण्याच्या नियमांचा उल्लेख असणार आहे. करोना प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांना समस्यांचा सामना करावा लागतोय. हे पाहता ICAI ने मेमध्ये होणारी CA इंटरमिटिएट आणि अंतिम परीक्षा स्थगित केली. सीए इंटरमिटिएट परीक्षा २२ मेला होणार होती. तर सीए फायनल परीक्षा २१ मेला होणार होती.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3wNzX3a
via nmkadda