TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

JEE Advanced: जेईई अॅडव्हान्स्डची माहिती पुस्तिका जारी; परीक्षेची तारीख लवकरच Rojgar News

2021: इंडियन इन्स्टिस्ट्यूट ऑफ टेक्नोलॉजी खडगपूरने (Indian Institute of Technology, IIT) जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेसाठी माहिती पुस्तिका आणि आवश्यक कागदपत्रांची यादी जारी केली आहे. संस्थेने सांगितले आहे की लवकरच परीक्षेची सुधारित तारीख देखील घोषित केली जाईल. जे विद्यार्थी या परीक्षेसाठी अर्ज करू इच्छितात, ते अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in वर जाऊन ब्रोशरसह डॉक्युमेंट्स लिस्ट चेक करू शकतात. संस्थेने यासंबंधी अधिकृत नोटिफिकेशन देखील जारी केले आहे. नोटिसनुसार, 'भारतात COVID 19 महामारीच्या सद्यस्थितीमुळे, JEE अॅडव्हान्स्ड परीक्षा २०२१ लांबणीवर टाकण्यात आली आहे. योग्य वेळी सुधारित तारीख घोषित करण्यात येईल. या व्यतिरिक्त यापूर्वी दिलेल्या रजिस्ट्रेशन, अॅडमिशन, काऊन्सिलिंगसह सुधारित तारखा जाहीर केल्या जाऊ शकतात. या व्यतिरिक्त जेईई अॅडव्हान्स्ड 2021 संबंधी विविध तारखा माहिती पुस्तिकेत दिल्या आहेत, ज्या नंतर सुधारित पद्धतीने कळवल्या जातील. याव्यतिरिक्त उमेदवारांना ब्रोशरद्वारे अधिक माहिती मिळू शकते. जेईई अॅडव्हान्स्डसाठी नोंदणी ७ जून पासून सुरू झाली आहे. १४ जुलै पर्यंत सुरू राहणार होते, मात्र करोना महामारीमुळे ही प्रक्रियादेखील स्थगित करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त नोटिफिकेशन मध्ये हेही म्हटले आहे की, ज्या उमेदवारांनी जेईई अॅडव्हान्स्ड २०२० साठी यशस्वीपणे नोंदणी केली होती, मात्र जेईई अॅडव्हान्स्ड २०२० च्या पेपर १ आणि पेपर २ साठी ते अनुपस्थित राहिले, ते सर्व उमेदवार जेईई अॅडव्हान्स्ड २०२१ ला उपस्थित राहण्यास पात्र आहेत. मात्र त्यांना ऑनलाइन रजिस्ट्रेशन पोर्टलमध्ये रजिस्ट्रेशन करून शुल्क भरावे लागेल. उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की एक उमेदवार सलग दोन वर्षांमध्ये जास्तीत जास्त दोन वेळा जेईई अॅडव्हान्स्डसाठी प्रयत्न करू शकतो.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3h7tmtY
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या