Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, २६ जून, २०२१, जून २६, २०२१ WIB
Last Updated 2021-06-26T10:47:38Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

RBI Result 2021: २०० हून अधिक सुरक्षा रक्षक भरतीच्या निकालाची घोषणा Rojgar News

Advertisement
RBI Result 2021: भारतीय रिझर्व बँक (RBI)ने सुरक्षा गार्डच्या पदांसाठी ऑनलाईन परीक्षा निकाल(RBI Result 2021) जाहीर केले आहेत. मार्च २०२१ मध्ये आरबीआय शोध परीक्षा झाली होती. हे उमेदवार आता आरबीआयची अधिकृत वेबसाइट rbi.org.in वर जाऊन तपासू शकता आणि डाऊनलोड करु शकता. या भरतीच्या माध्यमातून दिल्ली, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश, राजस्थान, हैदराबाद, चेन्नई, गुवाहाटीसहित अनेक राज्यांमध्ये RBI Security Guard ची भरती केली जाणार आहे. RBI परीक्षेचे निकाल खाली लिंकमध्ये देण्यात आले आहेत. उमेदवार खाली दिल्या गेलेल्या लिंकवर जाऊन यादी डाऊनलोड करु शकतात. आरबीआय सिक्युरिटी गार्ड निकाल 2021: असा तपासा आरबीआयची अधिकृत वेबसाइट rbi.org.in वर जा. मुख्यपृष्ठावरील Current Vacanciesटॅबवर जा नंतर 'रिजल्ट' लिंकवर क्लिक करा. एक नवे पेजे खुले होईल. यावर ' of Security Guards 2020 – Display of Roll Numbers of Provisionally Shortlisted Candidates'वर क्लिक करा. तुम्ही पेजवर जाल. “Roll numbers of Provisionally Shortlisted Candidates”लिंक वर क्लिक करा. आरबीआय सुरक्षा गार्ड निकालाची पीडीएफ खुली होईल. निवडलेल्या उमेदवाराचा रोल नंबर तपासा डाउनलोड करा आणि प्रिंट काढा निवडलेल्या उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलावले जाईल. ज्यानंतर प्रवेशपत्र आरबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर अपलोड होईल. प्रवेश पत्र जाहीर झाल्यानंतर तारखेची घोषणा केली गेली नाही. त्यामुळे शॉर्टलिस्ट केल्या गेलेल्या उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट पाहण्याचे आवाहन केले आहे. नोकरी तपशिल (RBI Security Guard Vacancy Details) रिझर्व बँक ऑफ इंडिया (RBI)ने भरती अभियान वेगवेगळ्या राज्यांमध्ये २४१ सिक्योरिटी गार्ड भरतीसाठी चालविले आहे. अर्ज २२ जानेवारी २०२१ पासून १२ फेब्रुवारी २०२१ पर्यंत सुरु होते. कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी पास आणि माजी कर्मचारी या भरतीसाठी अर्ज करु शकतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3gX5udJ
via nmkadda