Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, ३० जून, २०२१, जून ३०, २०२१ WIB
Last Updated 2021-06-30T06:47:36Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

कृषी आणि तंत्र एकत्रित; देशातील पहिले खासगी विद्यापीठ कोल्हापुरात Rojgar News

Advertisement
कोल्हापूर/प्रतिनिधी कृषी आणि तंत्र यांच्या एकत्रिकरणातून संशोधनाला नवीन आयाम देणारे देशातील कोल्हापुरात () स्थापन होत आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील शेतीत नवनवीन प्रयोग करण्यास मोठी मदत होणार असल्याने शेतकऱ्यांना ते मोठे वरदान ठरणार आहे. विशेष म्हणजे या विद्यापीठाचे उद्घाटन माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार () यांच्या हस्ते होणार आहे. देशात कृषी विद्यीपीठाबरोबरच तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विविध विद्यापीठे आहेत. पण, या दोन्हींचा संगम करत कोल्हापुरात नवीन विदयापीठाची स्थापना करण्यात आली आहे. गेल्या चार दशकापासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या डी. वाय. पाटील ग्रुपच्यावतीने जिल्ह्यातील तळसंदे येथे हे विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. मेडिकल, नर्सिंग, फ़िजिओथेरपी, इन्जिनिअरिंग, अॅग्रीकल्चर, मॅनेजमेन्ट आदी विविध क्षेत्रामध्ये हा ग्रुप कार्यरत आहे याबाबत अधिक माहिती देताना विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी सांगतिले की, कृषी व तंत्रज्ञान क्षेत्रातील हे नवे विद्यापीठ विद्यार्थ्याला केवळ पुस्तकी ज्ञान न देता व्यवहारज्ञानातही पारंगत बनवण्याचा प्रयत्न करेल. भविष्यकालीन गरजा ओळखून नव्या विद्यापीठाच्या माध्यमातून प्रयोगशील व अनुभवात्मक शिक्षण उपलब्ध करून दिले जाणार आहे. बाजारपेठेची मागणी, व्याप्ती व संधी लक्षात घेऊन या ठिकाणी विविध अभ्यासक्रमांची रचना करण्यात आली आहे. यामध्ये प्रत्यक्ष क्लासरूममधील शिक्षणावर ५० टक्के भर दिला जाणार असून ३० टक्के प्रयोगशील शिक्षण व २० टक्के अनुभव शिक्षण अशी रचना करण्यात आली आहे. ग्रुपचे उपाध्यक्ष व गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांनी सांगितले की, कृषी, अभियांत्रिकी व मॅनेजमेन्ट या क्षेत्रात अनेक वेगवान बदल होत असून त्याबाबत सतत नवनवे संशोधन होणे गरजेचे आहे. विद्यर्थ्यांच्या संशोधनवृत्तीला वाव मिळावा यासाठी काळाच्या गरजेनुसार विविध अभ्यासक्रम नव्या विद्यापीठात सुरु करण्यात आले आहेत. कोल्हापूर जिल्हाच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. त्यामुळे विद्यापीठात होणारे संशोधन प. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल आहे.. विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितले की, विद्यार्थ्याची क्षमता, कौशल्ये व आवड लक्षात घेऊन त्याला या विद्यापीठात अभ्यासक्रम निवडीची संधी मिळणार आहे. विद्यार्थ्याच्या सर्वकष विकासावर भर देणारे शिक्षण येथे मिळेल. नव्या विद्यापीठामुळे विद्यार्थ्यामध्ये उच्च बौद्धिक क्षमता निर्माण करणे, सर्जनशील व उद्योग पूरक शिक्षण देणे शक्य होणार आहे. उच्च शिक्षण व संशोधनासाठी देश व विदेशातील संस्थाबरोबर सहकार्य, भागीदारी व सामंज्यस्य करार केले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना करिअरच्या जास्तीत जास्त चांगल्या संधी मिळाव्यात यावर भर दिला जाणार आहे. या डी. वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचा शुभारंभ गुरुवार दि. १ जुलै रोजी व्हर्च्युअल पद्धतीने होणार आहे. माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार यांच्या हस्ते व माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, कृषिमंत्री दादा भुसे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी दिली.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2UMyj3H
via nmkadda