Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, २५ जून, २०२१, जून २५, २०२१ WIB
Last Updated 2021-06-25T13:47:15Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

शिक्षणमंत्र्यांची 'मन की बात'; उत्तरे न मिळाल्याने विद्यार्थी नाराज Rojgar News

Advertisement
NEET, , Update: केंद्रीय रमेश पोखरियाल यांनी आज विद्यार्थ्यांशी संवाद साधला. जाहीर केल्याप्रमाणे ते जेईई, नीट, सीबीएसई या सर्व परीक्षा आणि निकालावर बोलणार होते. सर्वांकडे ट्वीटर, फेसबुक, ईमेल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे प्रश्न विचारा असे ट्वीट शिक्षणमंत्र्यांनी केले होते. अनेकांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रश्नदेखील विचारले होते. पण प्रत्यक्षात शिक्षणमंत्र्यांनी आज मोजून ३ मिनिटे ४२ सेकंदांचा संवाद साधला. शंकाचे निरसन न झाल्याने विद्यार्थी आणि पालक वर्गाची घोर निराशा झाली. या भाषणात शिक्षणमंत्र्यांनी शिक्षण क्षेत्रात गेल्या काही दिवसात झालेल्या घडामोडींचा आढावा घेतला. सीबीएसई बोर्ड परीक्षा रद्द केल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे त्यांनी आभार मानले. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे समर्थन केले. आणि सीबीएसई मुल्यांकन पद्धतीवर विश्वास ठेवण्यास सांगितले. दरम्यान त्याचवेळी विद्यार्थी कमेंट बॉक्समध्ये विद्यार्थी , JEE Mains परीक्षेबद्दल प्रश्न विचारत होते. पण शिक्षणमंत्र्यांकडून यावर काही उत्तर आले नाही. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा सरकारने विचार केला आहे. पंतप्रधान मोदींना विद्यार्थ्यांबद्दल प्रेम आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी करत त्यांनी सीबीएसई १२ वी बोर्ड परीक्षांसंदर्भात ऐतिहासिक निर्णय घेतला. यासाठी आपण सर्वांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानूया असे शिक्षणमंत्री आपल्या भाषणात म्हणाले. सीबीएसईने दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मूल्यांकन पद्धत जाहीर केली आहे. मूल्यांकन पद्धतीवर खूश नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी पर्याय तयार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या योग्येतेसोबत न्याय होईल. त्यांची ऑगस्टमध्ये परिस्थिती नियंत्रणात आल्यावर परीक्षा होईल असे ते म्हणाले. काय म्हणाले होते शिक्षणमंत्री ? “प्रिय विद्यार्थ्यांनो, मला तुमचे अनेक संदेश आणि माहिती सतत मिळत आहे. तसेच, माझ्या आरोग्याबद्दल तुम्ही चिंता व्यक्त केली आहे. यासाठी मी आपणा सर्वांचे आभार व्यक्त करू इच्छितो आणि असे सांगू इच्छितो की आता मी स्वस्थ आहे. " करोनाची लक्षणे आढळल्याने पोखरीयाल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तुमच्या अनेक शंका तुम्ही मेसेजद्वारे विचारलात पण तब्येतीवर उपचार सुरु असल्या कारणाने मी कोणाला उत्तर देऊ शकलो नाही. पण तुम्हाला सीबीएसईबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही ट्वीटर, फेसबुक आणि मेलच्या माध्यमातून विचारु शकता असेही ते म्हणाले होते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3h4ncL3
via nmkadda