Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, २३ जुलै, २०२१, जुलै २३, २०२१ WIB
Last Updated 2021-07-23T05:43:07Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

CLAT 2021: कॉमन लॉ प्रवेश परीक्षा आजपासून, परीक्षाकेंद्रावर होणार एसओपीचे पालन Rojgar News

Advertisement
2021: () आजपासून २३ जुलै २०२१ पासून सुरु होत आहे. कंसोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी (Consortium of National Law Universities, NLU)ने नुकतेच या परीक्षेसंदर्भात निर्देश जाहीर केले आहेत. या अंतर्गत विद्यार्थ्यांना ड्रेस कोड आणि गाइडलाइन्स संदर्भातील अधिक माहिती अधिकृत वेबसाइट consortiumofnlus.ac.in वर जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाताना आपले प्रवेश पत्र सोबत घेऊन जाणे गरजेचे आहे. प्रवेश पत्रासोबतच उमेदवाराला परीक्षा केंद्रावर ओळख पटवण्यासाठी सरकारद्वारे देण्यात आलेले ओळखपत्र दाखवावे लागणार आहे. ड्रायव्हींग लायसन्स, वोटर आयडी कार्ड यासारख्या कागदपत्रांचा यामध्ये समावेश होते. ९९.१४ च्या वर तापमान असलेल्या उमेदवारांना एका वेगळ्या रुममध्ये परीक्षा द्यावी लागणार आहे. उमेदवारांना मास्त घालूनच परीक्षा द्यावी लागणार आहे. तसेच हातांना सॅनिटाइझ करावे लागणार आहे. या एसओपीचे पालन करावे लागणार आहे. उमेदवारांनी हाफ शर्ट किंवा टी शर्ट घालावे. ज्याला कोणते मोठे बटण किंवा बॅच नसेल. चप्पल किंवा सॅंडल घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे. महिला उमेदवारांना अंगठी, मोठे कानातले, नोझ पिनन, चैन घालण्याची परवानगी नाही. उमेदवारांनी CLAT 2021 परीक्षा केंद्रावर दुपारी १ वाजता रिपोर्ट करायला हवे. दुपारी २.१५ नंतर प्रवेश देण्यात येणार नाही. CLAT 2021 देशातील विविध २२ विद्यापीठांद्वारे यूजी आणि पीजी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणारी राष्ट्रीय पातळीवरील कायद्याची प्रवेश परीक्षा आहे. याचे आयोजन कंसोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीतर्फे केले जाते. परीक्षेसंदर्भात अधिकृत माहिती consortiumofnlus.ac.in वर मिळू शकते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3iIc87h
via nmkadda