Advertisement

indian : रेल्वे भरतीच्या नॉन टेक्निकल पॉप्यूलर कॅटेगरी (NTPC)साठी होणाऱ्या परीक्षेचा ७ वा आणि अंतिम टप्पा २३ जुलैपासून सुरु होणार आहे. ७६ शहरांच्या २६० केंद्रांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे. ज्यामध्ये साधारण २.७८ लाख विद्यार्थी सहभागी होणार आहेत. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी यासंदर्भात ट्वीटरवरुन माहिती दिली आहे. नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी भारतीय रेल्वेने माहिती दिली आहे. नॉन टेक्निकल पॉप्यूलर कॅटेगरी (NTPC) पदांसाठी सुरु असलेली कॉम्प्यूटर आधारित रेल्वे भरती असणार आहे. याच्या सातव्या टप्प्याचे आयोजन २३ ते ३१ जुलै दरम्यान केले जाणार आहे. करोना प्रादुर्भावामुळे सुरक्षेची काळजी घेत पहिल्या सहा टप्प्यांची परीक्षा घेण्यात आली. सातव्या टप्प्यात २.७८ लाख उमेदवारांसाठी कॉम्प्यूट आधारित अंतिम टप्पा असेल. देशभरात करोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेमुळे प्रभावित झालेल्यांसाठी २३,२४,२६ आणि ३१ जुलैला ही परीक्षा असेल. सीबीटीतर्फे देशभरातील साधारण २६० केंद्रांवरील ७६ शहरांमध्ये एसडी-५० मॉड्यूल अंतर्गत ५० टक्के उपस्थितीत परीक्षेची परवानगी देण्यात आली आहे. याठिकाणी सोशल डिस्टन्सिंगची काळजी घेतली जाणार आहे. रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बहुतांश उमेदवारांना त्यांच्या राज्यांमधील परीक्षा केंद्र देण्यात आले आहेत. जिथे राज्यांअतर्गत परीक्षा केंद्र देणे शक्य नव्हते तिथल्या उमेदवारांना रेल्वे सुविधा असणाऱ्या शेजारच्या राज्यात थांबवण्यात आले आहे. या टप्प्यातील उमेदवारांसाठी परीक्षा शहर आणि तारीख पाहण्यासाठी तसेच अनुसूचित जाती/जमातीच्या उमेदवारांसाठी मोफत प्रवासाची सुविधा आहे. यासंदर्भातील लिंक परीक्षेच्या १० दिवस आधी वेबसाइटवर डाऊनलोडसाठी उपलब्ध असणार आहे. तसेच ई-कॉल लेटर डाऊनलोड करणे, परीक्षा शहर आणि तारखेसंदर्भातील सूचनेची लिंक परीक्षेच्या चार दिवस आधीपासून सुरु होईल. परीक्षेची सूचना उमेदवाराला अधिकृत ईमेल आयडी आणि मोबाइल नंबरवर पाठवली जाणार असल्याचे रेल्वे विभागाने स्पष्ट केले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3qMLyNQ
via nmkadda