Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, ५ जुलै, २०२१, जुलै ०५, २०२१ WIB
Last Updated 2021-07-05T11:47:24Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

कोविडमुक्त गावातील शाळांची घंटा घणघणणार; आठवी ते १२ वीच्या वर्गांना सरकारचा हिरवा कंदील Rojgar News

Advertisement
कोविड-१९ महामारी संक्रमणामुळे गेले वर्षभर राज्यातील शाळा ऑनलाइन पद्धतीनेच सुरू आहेत. गेल्यावर्षी दिवाळीनंतर शालेय शिक्षण विभागाने शाळा प्रत्यक्ष सुरू करण्याचा प्रयत्न केला, मात्र करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या. पण आता करोना संसर्गाची परिस्थिती राज्यात अनेक ठिकाणी निवळत असल्याने कोविडमुक्त गावातल्या शाळा प्रत्यक्ष सुरू करण्यास राज्य सरकारने हिरवा कंदिल दाखवला आहे. तसे परिपत्रक सरकारने सोमवारी ५ जुलै रोजी जाहीर केले आहे. या शासन परिपत्रकानुसार, राज्यातील कोविडमुक्त गावांमधील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास राज्य सरकारने सशर्त मान्यता दिली आहे. शाळा सुरु करण्यापूर्वी तेथील ग्रामपंचायत वा स्थानिक स्वराज्य संस्थांनी तसा ठराव मंजूर करावयाचा आहे. हा ठराव पालकांशी चर्चा करून नंतरच करायचा आहे. शिवाय सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोर पालन करणे अनिवार्य आहे. पुढील नियम पाळणे शाळांना बंधनकारक - - शाळा सुरू करताना टप्प्याटप्प्याने मुलांना शाळेत बोलावण्यात यावे. विविध सत्रात वर्ग भरवावेत. - एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये ६ फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त १५-२० विद्यार्थी असावेत. - विद्यार्थ्यांनी सतत हात धुणे, मास्कचा वापर करावा. कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठवणे आणि त्वरित करोना चाचणी करून घेणे आदी बाबींचे शाळांनी काटेकोर पालन करायचे आहे. - संबंधित शाळेतील शिक्षकाची राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच गावात करण्यात यावी किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करू नये. - शाळा सुरू करण्यापूर्वी किंवा शाळा सुरू झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छताविषयक SOP चे पालन करावे. - पालकांनी आजारी किंवा लक्षण असलेल्या मुलांना शाळेत पाठवू नये. - विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून पूर्णत: पालकांच्या संमतीवर अवलंबून असेल. - शाळेचा परिसर दररोज नियमित स्वच्छ केला जावा. - वर्गखोल्या, नेहमी स्पर्श होणारे जिने, स्वच्छतागृहे आदी भाग यांचे वारंवार निर्जंतुकीकरण करण्यात यावे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3dGibY3
via nmkadda