... तर बारावीचा निकाल वेळेत अशक्य Rojgar News

... तर बारावीचा निकाल वेळेत अशक्य Rojgar News

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोनामुळे दहावीप्रमाणेच बारावीची परीक्षाही रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. बारावीचा निकाल कसा जाहीर करायचा, याबाबत अद्याप कोणत्याही मार्गदर्शक सूचना जाहीर झालेल्या नाहीत. यातच सर्वोच्च न्यायालयाने बारावीचे निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने लवकरात लवकर मार्गदर्शक सूचना जाहीर कराव्यात, अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे. दहावीचा निकाल कोणत्या निकषांच्या आधारे प्रसिद्ध करायचा याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर करून त्यानुसार काम सुरू झाले आहे. मात्र बारावीबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जर ३१ जुलैच्या आत बारावीचा निकाल जाहीर करायचा असेल, तर राज्य सरकारने गांभीर्याने दखल घेऊन वेळीच मार्गदर्शक सूचना जाहीर कराव्यात. जेणेकरून विद्यार्थ्यांना वेळेत निकाल देणे शक्य होईल, असे शिक्षकांचे म्हणणे आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्देश देऊन आठवडा उलटला तरी राज्य सरकारने बारावीच्या निकालाचे सूत्र जाहीर केलेले नाही. त्यामुळे विद्यार्थी व पालक चिंताग्रस्त झाले आहेत, असे मत महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे समन्वयक प्रा. मुकुंद आंधळकर यांनी व्यक्त केले. शिक्षण खात्याने बरेच दिवस अनेक बैठका घेतल्या आहेत, चर्चा केली आहे. मात्र सूचना जाहीर केलेल्या नाहीत. निकालाचे सूत्र जाहीर केल्यानंतर किमान ३० ते ४५ दिवस निकाल जाहीर व्हायला लागतील. निकालास उशीर झाल्यास राज्यातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षणापासून वंचित राहावे लागेल. उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे प्रवेश उशिरा होतील व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल. निकाल लवकर लागावा म्हणून सरकारने त्वरित निकालाचे सूत्र जाहीर करावे, असेही आंधळकर म्हणाले. निर्णय मंत्रालयात राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने बारावीच्या मूल्यमापन निकषांबाबतचा प्रस्ताव शिक्षण मंत्रालयात सादर केल्याचे सूत्रांकडून समजते. याबाबत मंत्रालयातून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. आता हा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, असे मत शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hqfdYU
via nmkadda

0 Response to "... तर बारावीचा निकाल वेळेत अशक्य Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel