Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, ६ जुलै, २०२१, जुलै ०६, २०२१ WIB
Last Updated 2021-07-06T14:47:42Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

आंबेडकर विद्यापीठात यूजी कोर्सेससाठी १२ जुलैपासून करा अर्ज Rojgar News

Advertisement
Ambedkar University Delhi : दिल्लीतर्फे नव्या शैक्षणिक सत्रासाठी सहा महिन्याचा कार्यक्रम सुरु केला जाणार आहे. १२ जुलैला पदवी कार्यक्रमासाठी नोंदणी प्रक्रिया सुरु होणार आहे. पदव्युत्तर कार्यक्रमासाठी नोंदणी प्रक्रिया जुलैच्या अखेरिस सुरु होणार आहे. पदवी कार्यक्रमातील प्रवेश हा योग्यतेच्या आधारे होईल आणि विद्यापीठातर्फे कटऑफ जाहीर केली जाईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. विद्यापीठातर्फे प्रवेशाचा तपशील सोमवारी जाहीर करण्यात आला. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये विद्यापीठातर्फे सहा नवे कार्यक्रम सुरु करण्यात येतील अशी माहिती दिल्लीच्या आंबेडकर विद्यापीठाचे कुलगुरु प्राध्यापक अनु सिंह लाठेर यांनी दिली. विद्यार्थ्यांसाठी प्रवेश माहिती पत्रक जाहीर केल्यानंतर ते बोलत होते. बीए हिंदी (ऑनर्स), मास्टर्स ऑफ पब्लिक हेल्थ, एम वोक टूरिझम अॅण्ड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, एमए इन आर्किओलॉजी आणि हेरीटेज मॅनेजमेंट (एमएएचएम), एमए इन कंजर्वेशन, प्रिजर्वेशन अॅण्ड हेरिटेज मॅनेजमेंट (एमसीपीएचएम), इंटीग्रेडेड एमए-पीएचडी (आयपीएचडी) हे नवे अभ्यासक्रम आहेत. करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने विद्यापीठातर्फे मास्टर इन पब्लिक हेल्थ हा नवा अभ्यासक्रम सुरु केल्याचे ते म्हणाले. ह्यूमन इकॉलॉजी(Human Ecology)मध्ये इंटीग्रेडेट MA-PHD (IPhD)नव्या शैक्षणिक धोरणानुसार केले जाणार आहे. यावर्षी चार वर्षांचा बीए (ऑनर्स) पॉलिटिकल सायन्स प्रोग्राम सुरु करणार आहोत आणि नवीन शैक्षणिक धोरणानुसार इतर काही अभ्यासक्रम देखील आणले जातील असेल लाठेर यांनी आपल्या भाषणात सांगितले. दिल्ली इंस्टीट्यूट ऑफ हेरिटेज अॅण्ड मॅनेजमेंट हे आधी गुरु गोबिंद सिंह इंद्रप्रस्थ विद्यापीठाचा एक भाग होते. स्थानिक सरकारद्वारे हे आंबेडकर विद्यापीठ दिल्ली स्कूल म्हणून घोषित केले गेले आहे. पुरातत्व आणि वारसा व्यवस्थापन (एमएएचएम) मध्ये एमए आणि संरक्षण, संरक्षण आणि वारसा व्यवस्थापन (एमसीपीएचएम) मध्ये एमएएमध्ये स्कूल ऑफ हॅरिटेज रिसर्च आणि मॅनेजमेंट असे दोन अभ्यासक्रम आंबेडकर विद्यापीठ दिल्ली येथून शिकविले जाणार आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3dQeEH0
via nmkadda