TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

नीट परीक्षा आता १३ भाषांमध्ये होणार, भारतीयांसाठी कुवेतमध्ये परीक्षा केंद्र Rojgar News

13 languages: नीट परीक्षेमध्ये (NEET Exam) दरवर्षी लाखो विद्यार्थी सहभागी होतात. देशातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये (India's Top Medical College) प्रवेश मिळविण्यासाठी या परीक्षेत मोठी स्पर्धा असते. वैद्यकीय संस्थानांमध्ये प्रवेश करण्यासाठी घेण्यात येणारी नीट पदवी परीक्षा पहिल्यांदाच १३ भाषांमध्ये होणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यासंदर्भात माहिती दिली. नीट परीक्षांमध्ये आता पंजाबी आणि मल्याळी भाषा जोडण्यात आल्या आहेत. पश्चिम आशियामधील भारतीय विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट)चे कुवेतमध्ये नवे परीक्षा केंद्र उघडण्यात आले आहे. नीट पदवी २०२१ ची नोंदणी प्रक्रिया वेबसाइटवर खुली झाली आहे. इतिहासात पहिल्यांदाच पश्चिम आशियातील विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी कुवेतमध्ये परीक्षा केंद्र उघडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले. पहिल्यांदाच १३ भाषांमध्ये होणार असून पंजाबी, मल्याळी भाषा यामध्ये जोडण्यात आल्याचे ते म्हणाले. आता पंजाबी, आसामी, बंगाली, ओड़िया, गुजराती, मराठी, तेलगू, मल्याळी, कन्नड, तामिळ, उर्दू आणि इंग्रजी भाषांमध्ये परीक्षांचे आयोजन होणार असल्याचे ते म्हणाले. नीट प्रवेश परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन देशातील सर्वोत्तम महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळावा हे प्रत्येक उमेदवाराचे स्वप्न असते. यासाठी विद्यार्थी खूप मेहनत घेतात. या परीक्षेसाठी उमेदवार बारावी पास असणे गरजेचे असते. तसेच उमेदवाराने बारावीला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा बायोटेक्नोलॉजी विषय घेणे गरजेचे असते. उमेदवाराला बारावीमध्ये ५० टक्क्यांहून अधिक गुण असणे गरजेचे असते. तसेच एससी, एसटी, ओबीसी या आरक्षित वर्गासाठी ४० टक्क्यांहून अधिक गुण असणे गरजेचे असते. नीट परीक्षा देण्यासाठी कोणती वयोमर्यादा नसते. उमेदवार कितीही अटेम्प्ट देऊ शकतात. उमेदवाराचे वय १७ वर्षे पूर्ण असणे गरजेचे असते. ही परीक्षा ३ तासांची असते. ज्यामध्ये १८० प्रश्न असतात. फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तीन विषयांचे पेपर द्यावे लागतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3yVhoei
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या