Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, २६ जुलै, २०२१, जुलै २६, २०२१ WIB
Last Updated 2021-07-26T10:43:46Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

उच्च शिक्षणातील संशोधनास ५० हजार कोटी देणार, धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा Rojgar News

Advertisement
National Research Foundation: भारत सरकारतर्फे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अंतर्गत नॅशनल रिसर्च फाऊंडेशनसाठी एकूण ५० हजार कोटी रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय शिक्षणमंत्री यांनी केली. लोकसभेत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. ही रक्कम पाच वर्षाच्या कालावधीसाठी देण्यात येणार आहे. यामुळे देशातील घेणाऱ्या विद्यार्थ्यांना करताना फायदा होणार आहे. उच्च शिक्षणात संशोधन आणि शिक्षण, संशोधन आणि कौशल्य विकासासंदर्भात लोकसभेत प्रश्न विचारण्यात आला. याला धर्मेंद्र प्रधान यांनी सविस्तर उत्तर दिले. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरील १५ ऑगस्टच्या भाषणातून नॅशनल रिसर्च फाऊंडेशनबद्दल उल्लेख केला आहे. यासंदर्भात सल्लागारांशी विचार विनिमय सुरु आहे. हे करण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचे ते म्हणाले. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला त्यांनी ही माहिती दिली. धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन भाषणाचा व्हिडीओ शेअर केला आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अंतर्गत केंद्र सरकारतर्फे नॅशनल रिसर्च फाऊंडेशन तयार करण्यासाठी बजेट आणि इतर विभागातील संशोधन संदर्भातील फंड एकत्र करुन येणाऱ्या पाच वर्षात ५० हजार कोटी देण्यात येतील असे केंद्रीय शिक्षणमंत्री म्हणाले. हे संशोधन देशभरात नाविण्य घेऊन येईल, देशाची आवश्यकता पूर्ण करेल. सामान्य लोकांच्या आयुष्यात यामुळे सुविधा येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच भारतातील विद्यार्थ्यांना नव्या संशोधनासाठी सहाय्य करेल अशा पद्धतीचा उपक्रम सरकारकडून आणला जात असल्याचे ते यावेळी म्हणाले. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अंतर्गत सुरु होणार नॅशनल रिसर्च फाऊंडेशन हे आत्मनिर्भर भारतचा एक भाग आहे. यामुळे तरुण वर्ग सक्षम होईल असे धर्मेंद्र प्रधान म्हणाले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3x6fyFO
via nmkadda