Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, ६ जुलै, २०२१, जुलै ०६, २०२१ WIB
Last Updated 2021-07-06T13:47:18Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

'स्क्रीम टाइम'मुळे मुलांमधील नेत्रविकारांत होतेय वाढ Rojgar News

Advertisement
म. टा. प्रतिनिधी, नाशिक करोनाकाळातल लॉकडाउनमुळे सगळेच घरी असल्याने मोठ्यांमध्ये टीव्ही, लॅपटॉप, मोबाइलचा वापर वाढला आहे, तर चिमुकल्यांचे शिक्षणच ऑनलाइन सुरू असल्याने मोबाइल वापराशिवाय पर्याय नाही. अशात सर्वच वयोगटांतील नागरिकांचा स्क्रीनटाइम वाढला आहे. यामुळे नेत्रविकारांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत डोळे तपासायला येणाऱ्या रुग्णांच्या प्रमाणात वीस टक्यांपर्यंत वाढ झाल्याचे नेत्रविकार तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 'वर्क फ्रॉम होम'मुळे नेहमीपेक्षा अधिक काम करावे लागत आहे. तर ऑनलाइन शिक्षण सुरू असल्याने दीर्घकाळ गॅझेटच्या स्क्रीनकडे मुलांना एकटक बघावे लागत आहे. यामुळे डोळ्यांवर ताण वाढत असताना डोळे कोरडे पडणे, डोळ्यांतून पाणी येणे, डोके दुखणे, डोळ्यांची जळजळ होणे, डोळे लाल होणे, झोप अपूर्ण होणे, मोबाइल बंद केल्यावर समोरचे न दिसणे, अंधूक दिसणे, गरगरणे अशा समस्यांमध्ये वाढ झालेली आहे. ज्यांना आधीच चष्मा आहे, अशांच्या चष्म्याच्या नंबरमध्येही वाढ झाली आहे. लॅपटॉप, कॉम्प्युटरच्या मोठ्या स्क्रीनची सोय नसल्याने बहुतांश लहान मुलांना स्मार्टफोनवरच लेक्चरमध्ये सहभागी व्हावे लागत आहे. मोबाइलमधील बारीक फॉन्ट सातत्याने बघितल्यामुळे डोळ्यांशी निगडीत समस्या अधिक वाढतात. काही मुलांमध्ये 'कॉन्व्हर्जन्स डेफिसिएन्सी'चीही समस्या जाणवू लागली आहे. स्क्रीनच्या जास्त जवळून बघितल्याने स्नायू थकतात. यामुळे स्क्रीनवरून नजर हटविल्यास काही वेळासाठी दिसणे बंद होते. यालाच 'कॉन्व्हर्जन्स डेफिसिएन्सी' म्हटले जाते. ..अशी घ्या खबरदारी आहारात 'व्हिटॅमिन ए'चे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी गाजर, हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करावा. काळी खजूर, संत्रे, टोमॅटो, बदाम हे पदार्थ खावेत. स्क्रीनटाइम शक्य तितका कमी करण्याचा प्रयत्न करावा. याचबरोबर दिवसभर मोबाइल, लॅपटॉपवर काम असलेल्यांनी डोळ्यांचा व्यायाम करणे आवश्यक आहे. अधूनमधून हाताचा पंजा डोळ्यांवर ठेऊन त्यांना आराम द्यावा. मानसिक तणावही कमी करणे गरजेचे आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3AA2Q5t
via nmkadda